IPL 2024 Mahendra Singh Dhoni : भर मैदानात चाहता जेव्हा धोनीच्या पाया पडतो

IPL 2024 Mahendra Singh Dhoni : मैदानातील सगळी सुरक्षा भेदून हा चाहता फलंदाजी करत असलेल्या धोनीजवळ पोहोचला. 

183
IPL 2024 Mahendra Singh Dhoni : भर मैदानात चाहता जेव्हा धोनीच्या पाया पडतो
  • ऋजुता लुकतुके

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या सक्रिय नसला तरी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हा देशातील सगळ्यात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे याबद्दल कुणाचं दुमत नसावं. त्यामुळेच आयपीएलमध्ये तो फलंदाजीला आला की, त्याच्या नावाचा गजर होतो आणि चाहते अगदी त्याच्या पायाही पडतात. गुजरात विरुद्ध अहमदाबादला झालेल्या सामन्यात तर प्रचंड सुरक्षा व्यवस्था भेदून एक चाहता थेट मैदानात खेळपट्टीपर्यंत पोहोचला आणि तिथे त्याने धोनीसमोर साक्षात दंडवत धातला. (IPL 2024 Mahendra Singh Dhoni)

चेन्नईच्या डावातील ते शेवटचं षटक होतं आणि चाहता मैदानात घुसल्यामुळे काही काळ खेळही थांबवावा लागला. काही क्षण धोनीही (Mahendra Singh Dhoni) गोंधळला. पण, अखेर त्याने चाहत्याला उठवून त्याला आलिंगन दिलं. त्याच्या या सहृदय वागणुकीनेही प्रेक्षकांची मनं जिंकली. (IPL 2024 Mahendra Singh Dhoni)

(हेही वाचा – Raj Thackeray: शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आनंद आश्रमात जाणार!)

धोनीने (Mahendra Singh Dhoni) या हंगामाच्या सुरुवातीलाच चेन्नईची कप्तानी सोडली आहे. पण, यष्टीरक्षण आणि फंलदाजीत मात्र तो पूर्वीसारखा मैदान मारताना दिसतोय. त्याच्या नावावर सूर मारून टिपलेले झेल आहेत. तसंच तळाला येऊन षटकारांची आतषबाजी करत केलेल्या छोटेखानी खेळी आहेत. गुजरात विरुद्धही त्याने ११ चेंडूंत नाबाद २६ धावांची खेळी साकारली. सामना मात्र चेन्नईने ३५ धावांनी गमावला. गुजरातने समोर ठेवलेल्या २३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ ८ बाद १९६ धावाच करू शकला. (IPL 2024 Mahendra Singh Dhoni)

गुजरातकडून शुभमन गिल (५५ चेंडूंत १०४) आणि साई सुदर्शन (५१ चेंडूंत १०३) यांनी २१० धाावांची सलामी देत गुजरातला ३ बाद २३१ अशी धावसंख्या उभारून दिली. (IPL 2024 Mahendra Singh Dhoni)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.