Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगाबाहेर येताच केलं रोड शोचं प्लॅनिंग, अधिकृत ”X”द्वारे दिली माहिती

156
...कुणी पाणी देता का पाणी; Delhi Govt ची हाक

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP)संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना अखेर तब्बल ५० दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपात केजरीवाल यांना अंमलबाजवणी संचालनालयाकडून (ED)अटक करण्यात आली होती. देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं वातावरण तापलेलं आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचाराला वेग देण्यात आला आहे. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप वाढत असताना, अरविंद केजरीवाल यांच्या जामिनामुळे विरोधकांची ताकद वाढली असल्याचं मानलं जात आहे. अरविंद केजरीवाल यांची शनिवारी , (११ मे) पत्रकार परिषद होणार असून ते यावेळी उपस्थितांना संबोधित करतील.

केजरीवाल कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करतील. आम आदमी पक्षाच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद होणार आहे. यानंतर अरविंद केजरीवाल दक्षिण दिल्लीतील महरौली भागात रोड शो करतील. त्यानंतर ६ वाजता ते पूर्व दिल्लीच्या कृष्णानगरमध्येदेखील रोड शो करणार आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी जामीन मिळाल्यानंतर तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. “मला तुमच्यात येऊन आनंद होतो आहे. या हुकूमशाही विरुद्ध मला लढायचं आहे. परंतु देशातल्या १४० करोड लोकांनी या लढाईत एकत्र आलं पाहिजे.” असं ते म्हणाले. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवाल यांच्या जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.