लोकसभा २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका पूर्ण झाल्या असून उर्वरित दोन टप्प्यातील निवडणूक बाकी आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीचा (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election) प्रचार शिगेला पोहोचला आहे. येत्या सोमवारी लोकसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून, शनिवारी या प्रचार सभांच्या तोफा थंडावणार आहेत. या प्रचार सभांचा तोफा थंडावण्या अगोदर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (Shivsena) आणि उबाठा (UBT) गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. ज्यानंतर शहरातील मुख्य चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. (Chhatrapati Sambhajinagar)
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे संदिपान भुमरे (Sandipaan Bhumre) यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर यावेळेस संभाजीनगरमध्ये धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत होणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) दोघेही आपआपल्या उमेदवारांसाठी शहरात होते. शनिवारी दोन्हीकडून उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात करण्यात आले. महायुतीची रॅली शिवाजीनगर येथून निघून क्रांतीचौक मार्गे टीव्ही सेंटर येथे जाणार होती. तर महाविकास आघाडीची रॅली क्रांतीचौक येथून निघणार होती. दरम्यान, दुपारी बारा वाजता दोन्ही रॅली समोरासमोर आल्या. यामुळे कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
(हेही वाचा – Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगाबाहेर येताच केलं रोड शोचं प्लॅनिंग, अधिकृत ”X”द्वारे दिली माहिती)
परंतु, क्रांती चौकात गोंधळाची स्थिती निर्माण झाली असता या ठिकाणी पोलिसांची फौज नव्हती, त्यामुळे अधिक तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण काही वेळानंतर या ठिकाणी पोलिसांची फौज येता परिस्थिती नियंत्रणाात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते होऊ शकले नाही. तर ज्या लोकांनी राम मंदिरावर टीका केली, त्या धर्माध लोकांना घेऊन रॅली काढली जात आहे. जय श्रीराम म्हणण्याची हिम्मत आहे का? असा प्रश्न मनसे जिल्हाध्यक्षांनी उपस्थित केला.
महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना विरोध करण्यासाठी आइसक्रीमचे कोण दाखवण्यात आले. तर त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही दारुची बाटली दाखवून महायुतीच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यामुळे या ठिकाणचे वातावरण आणखीणच तापल्याचे पाहायला मिळाले. परिणामी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, सर्वसामान्य नागरिकांना या राड्याचा मोठा फटका बसलाआहे. (Chhatrapati Sambhajinagar)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community