- ऋजुता लुकतुके
पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यानंतर बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली पंजाबचे खेळाडू अर्शदीप सिंग आणि हरप्रीत ब्रार यांच्या कुटुंबीयांना आवर्जून भेटला. आपल्या मनमिळावू वागण्याने त्याने कुटुंबीयांना खुशही केलं. अर्शदीपच्या कुटुंबीयांची फोटो काढण्याची इच्छाही त्याने पूर्ण केली. पंजाब किंग्ज संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे फोटो झळकले आहेत. या फोटोंतून आयपीएलमधील (IPL) संघांतील परस्पर संबंध कसे खेळीमेळीचे आहेत हे दिसतं असं या संदेशात पंजाब संघ प्रशासनाने म्हटलं आहे. (IPL 2024 Virat Kohli)
या व्हिडिओत विराट ड्रेसिंग रुम सोडून पंजाबच्या गॅलरीकडे येताना दिसतो आणि त्यानंतर हसत हसत तो अर्शदीपच्या आईला सामोरा जातो. कुटुंबातील प्रत्येकाची विराट आस्थेनं चौकशी करतानाही दिसतो. (IPL 2024 Virat Kohli)
How many times have you watched this reel? 🥹❤️
Admin – Yes.#SaddaPunjab #PunjabKings #JazbaHaiPunjabi #TATAIPL2024 #PBKSvRCB pic.twitter.com/nOW13UgdkZ— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 10, 2024
(हेही वाचा – Nitin Gadkari: जे कामाने निवडून येत नाही, ते जातीची ढाल पुढे करतात; नितीन गडकरींचा काँग्रेसवर घणाघात)
पराभवानंतर पंजाबचं आव्हान मात्र संपुष्टात
हिमाचल प्रदेशच्या धरमशाला इथं झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६२ धावांनी पराभव केला. या सामन्यात खुद्द विराटने ४७ चेडूंत ९२ धावांची खेळी करत बंगळुरूला ७ बाद २४१ धावा उभ्या करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. या कामगिरीच्या जोरावर सामनावीराचा पुरस्कारही त्याने पटाकावला. (IPL 2024 Virat Kohli)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सध्या १२ सामन्यांत १० गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्या पराभवानंतर पंजाबचं आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे. बंगळुरूसाठी बाद फेरीचं आव्हान कठीण असलं तरी उर्वरित सर्व सामने जिंकून जर इतर संघांचे निकालही मनासारखे लागले तर त्यांना बाद फेरीची आशा बाळगता येईल. बंगळुरूचा पुढील सामना रविवारी दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. (IPL 2024 Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community