Whatsapp Changes : व्हॉट्सॲपमध्येही आता दिसणार नाईट मोड

Whatsapp Changes : व्हॉट्सॲपने आपला लुक आणि काही फिचर्समध्ये बदल करण्याचं ठरवलं आहे. 

208
Whatsapp Changes : व्हॉट्सॲपमध्येही आता दिसणार नाईट मोड
  • ऋजुता लुकतुके

तुम्ही व्हॉट्सॲप (Whatsapp) नियमितपणे वापरत असाल तर तुम्हाला काही बदल जाणवले असतील. मेटा कंपनी आता अँड्रॉईड आणि आयओएसवर व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी काही मूलभूत डिझायनिंगचे बदल करत आहे. व्हॉट्सॲपचा वापर अधिक सोपा आणि सुटसुटीत व्हावा आणि काही फिचर्सचा समावेश करता यावा यासाठी हे बदल कंपनी करत आहे. सुरुवात झाल्यापासून व्हॉट्सॲपचं डिझाईन हे बदललेलंच नाही. त्यामुळे सगळ्यात आधी त्यात काही बदल करण्यात येणार आहेत. (Whatsapp Changes)

सगळ्यात महत्त्वाचा बदल झालाय तो रंगात आणि नाईट मोडमध्येही बदल झाला आहे. हिरवा रंग ही व्हॉट्सॲपची ओळख बनलाय. शिवाय अपुऱ्या प्रकाशातही हा रंग डोळ्यांना त्रास देत नाही. व्हॉट्सॲपने (Whatsapp) ३६ रंगांची चाचणी घेऊन नंतर हा रंग निवडला आहे. आता हिरवा रंगाच्याच काही वेगळ्या छटा तुम्हाला या मेसेंजरमध्ये दिसतील. तर डार्क मोड थोडा जास्त गडद झालेला दिसेल. त्यामुळे मेसेंजरचा वापर अधिक आरामदायी होणार आहे. (Whatsapp Changes)

(हेही वाचा – ऐन प्रचारसभेत शिवसेनेसह उबाठा गट आमने-सामने; कार्यकर्त्यांचा Chhatrapati Sambhajinagar मध्ये राडा)

व्हॉट्सॲपची सगळी मुख्य फिचर्स नजरेसमोर दिसावीत यासाठी आता चॅट्सच्या खाली एक नवीन नेव्हिगेशन बार दिला जाणार आहे. यात चॅट्स, कॉल, अपडेट्स अशा गोष्टी एका नजरेत दिसतील आणि ते बटन दाबून तुम्ही ती सेवा वापरू शकाल. अँड्रॉईड तसंच आयओएस प्रणालीतही हा नेव्हिगेशन बार दिसणार आहे. तर व्हॉट्सॲपवरून (Whatsapp) एखादा मीडिया, फाईल अशा गोष्टी पाठवायच्या असतील तर ते फिचरही अधिक सोपं आणि सुटसुटीत झालं आहे. जी गोष्ट पाठवायची आहे तो ट्रे आता मोठा झाला आहे. व्हॉट्सॲपवरील हे बदल आधी आयओएसवर सुरू होतील आणि त्यानंतर ते अँड्रॉईडवर येतील. (Whatsapp Changes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.