- ऋजुता लुकतुके
आयपीएलमध्ये आता शेवटचे १२ साखळी सामने बाकी आहेत. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स दरम्यानच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोलकाताचा सपोर्ट स्टाफ अभिषेक नायर यांच्यातील चर्चेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरंतर हा व्हिडीओ केकेआरनं पोस्ट केला होता. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केकेआरनं त्यांची पोस्ट डिलीट केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध असून यासंदर्भात दावे प्रतिदावे केले जात आहेत. रोहित शर्मा आणि अभिषेक नायरची चर्चा स्पष्टपणे समजत नसली तरी जेवढं समजतंय त्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. (IPL 2024 Mumbai Indians)
रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर केकेआरनं पोस्ट केला होता. यामध्ये मैदानावरील प्रेक्षकांचा गोंधळ देखील ऐकायला येत असल्यानं दोघांची चर्चा स्पष्टपणे समजत नाही. रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणतो,”एक-एक गोष्ट बदलत आहे, ते त्यांच्यावर आहे, जे पण आहे ते माझे घर आहे भावा, ते मंदिर आहे ना ते मी बनवलं आहे. भावा माझं काय, माझं तर हे शेवटचं”, असं रोहित शर्मा म्हणत असल्याचा दावा करण्यात येतो. काही जणांनी यावरुन ही मोठी बातमी असल्याचं म्हटलंय. रोहित शर्मा पुढील आयपीएल मुंबईकडून खेळणार का याबाबत देखील चर्चा सुरु झाल्या. काहींनी रोहित शर्मा पुढचं आयपीएल कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळेल का असा प्रश्न उपस्थित केला. (IPL 2024 Mumbai Indians)
THIS IS BIG 👀
Rohit Sharma to Abhishek Nayar: Ek Ek chiz change ho raha hai…Vo unke upar hai…Vo mera ghar hai mene banaya usko temple samajhke (video posted by KKR, they deleted it later)
Rohit in KKR next season?pic.twitter.com/VtcV1LwWp0#MumbaiIndians | #IPL2024 |…
— CricWatcher (@CricWatcher11) May 10, 2024
रोहित शर्मानं (Rohit Sharma) हे माझं शेवटचं असं काही म्हटलंच नसल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. आयकॉनिक हिटमॅन या एक्स प्लॅटफॉर्मवरील यूजरनं रोहित शर्मानं तसं वक्तव्य केलं नसल्याचं म्हटलंय. (IPL 2024 Mumbai Indians)
(हेही वाचा – Whatsapp Changes : व्हॉट्सॲपमध्येही आता दिसणार नाईट मोड)
Clear audio of Rohit Sharma and Abhishek Nayar’s conversation, he didn’t said that it’s his last IPL.
Please don’t make any conclusions on half said words.🙏pic.twitter.com/9lbtZRQvQB
— Aryan 🇮🇳 (@Iconic_Hitman) May 10, 2024
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अभिषेक नायर यांच्यातील चर्चा स्पष्टपणे समजत नाही. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यात मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन पदाबाबत चर्चा सुरु असल्याचा अंदाज लावला जात आहे. (IPL 2024 Mumbai Indians)
दरम्यान, मुंबईचं नेतृत्त्व यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या करतोय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबईची कामगिरी निराशाजनक झालीय. रोहित शर्मा मुंबईचा कॅप्टन नसल्याची गोष्ट चाहत्यांना अजूनही पचनी पडलेली नाही. मुंबई इंडियन्सचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपलं असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत. (IPL 2024 Mumbai Indians)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community