छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथील पैठण गेट परिसरात मतदानाच्या एक दिवस आधी पोलिसांनी सुमारे 39 लाख 65 हजारांची रक्कम जप्त केली आहे. पैठण गेट परिसरातील एका मोबाईलच्या दुकानातून ही रक्कम जप्त करण्यात आली. शिवाय सोबत पैसे मोजण्याची मशीन देखील आढळून आली आहे. या दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी ही रक्कम ठेवण्यात आली होती. तसंच दुकानदाराकडून या रकमेबाबत समाधानकारक उत्तर मिळाली नसल्यानं ही रक्कम जप्त करण्यात आली. तसंच याप्रकरणी आता पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar)
(हेही वाचा –IPL 2024 Mumbai Indians : रोहित आणि अभिषेक नायरमधील व्हिडिओ व्हायरल, रोहित मुंबई इंडियन्स सोडणार?)
मोठ्या प्रमाणावर हा पैसा कुठून नेला जात होता? याची चौकशी केली जात आहे. या रकमेचा निवडणुकीशी काही संबंध आहे का? यासंदर्भात देखील पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, “निवडणूक काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहे. आम्हाला आमच्या खबऱ्यांकडून दहा दिवसापूर्वी या संदर्भात माहिती मिळाली होती. आम्ही दुकानावर दहा दिवस पाळत ठेवून होतो.” अशी माहिती दिली. (Chhatrapati Sambhaji Nagar)
(हेही वाचा –यंदाची लोकसभेची निवडणूक म्हणजे विकास विरुद्ध द्वेष, Neelam Gorhe यांचा घणाघात)
दरम्यान निवडणुक काळात रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. ते रोखण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक ठिकाणी तपासणी नाके उभारले जातात आणि संशयित वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली जाते. (Chhatrapati Sambhaji Nagar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community