जत-सांगोला राज्य मार्गावर सोनंद येथील चव्हाण वस्तीजवळ शनिवारी सकाळी भरधाव मोटारीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात ३ महिला मजूर ठार झाल्या, तर १० महिला जखमी झाल्या आहेत. (Accident)
अथणी तालुक्याचा उत्तर भाग दुष्काळी आहे. यामुळे या भागातील मजूर महाराष्ट्रातील द्राक्ष कामांसाठी जातात. नेहमीप्रमाणे द्राक्षबागेच्या कामाला कासेगाव (ता. सांगोला) येथे जात होत्या. या मोटारीत एकूण १२ मजूर होते. द्राक्षबागेत काम करण्यासाठी मोटारीत सगळ्या महिलाच होत्या. त्यावेळी राज्यमार्गावर मोटीरीचा टायर फुटल्याने सकाळी ८:३० वाजता अपघात झाला.
गीता रवींद्र जोडमणी (३६), महादेवी श्रीशैल चौगुला (४०) आणि कस्तुरी शंकर तावशी ऊर्फ बिरडी (५०), अशी ठार झालेल्या महिलांची नावे आहेत, उज्ज्वला दोडमणी आणि कविता चौगुले यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना सांगली येथील सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. मोटारचालक कुमार जगदाळ यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे, तर मुतव्वा दोडमणी, सत्यव्वा चौगुले, राजाक्का दोडमणी, अश्विनी दोडमणी, महादेवी दोडमणी, गीता मडीमणी, राजश्री काळ्यागोळ, अशी किरकोळ जखमी असलेल्यांची नावे आहेत.
(हेही वाचा – बंगाली कला, परंपरा आणि शैली उत्तर भारतात आणणारे सुप्रसिद्ध भारतीय चित्रकार Sukumar Bose)
गंभीर आणि किरकोळ जखमींना उपचारासाठी मिरज आणि सांगलीला पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी सांगोल्याचे पोलीस उपनिरीक्षक भीमराव खणदाळ यांनी भेट देऊन पंचनामा केला. सांगोला पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दररोज द्राक्षबागेत काम करून या मजूर महिला त्यांच्या घरचा उदरनिर्वाह चालवत होत्या. या भीषण अपघातामुळे बाळीगेरी आणि मलाबाद गावावर शोककळा पसरली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community