उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सकाळ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. असा गौप्यस्फोट फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यावेळी केला.
उद्धवजींना युतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली होती
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंच्या आदरापोटी आणि श्रद्धेपोटी आम्ही तसे वागायचो. खरे तर उद्धवजींना युतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली होती. १९९९ मध्येच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.” (Devendra Fadnavis)
उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, असं मला कधीच वाटलं नव्हतं
“भाजपाला सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण २०१९ मध्ये त्यांनी वेगळी आघाडी केली. मी मनापासून सांगतो की, आम्ही वैचारिक निष्ठांना सर्वाधिक महत्त्व देतो. बाळासाहेबांचे चिरंजीव कसे वागू शकतात यावर आमचा विश्वास होता. पण आमची चूक झाली.” (Devendra Fadnavis)
पक्षकार्यकर्ता म्हणुन मी ते केले
“राज्यात युतीच सरकार आणूनही मी मुख्यमंत्री झालो नाही, याचा मला धक्का बसला होता. नंतर लगेच मी विरोधी पक्षनेता या नात्याने काम करू लागलो. संकटे, आव्हाने येत असतात. पुढे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याबाबतचा निर्णय घेण्यात माझा महत्त्वाचा सहभाग होता. पक्षकार्यकर्ता म्हणुन मी ते केले.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. (Devendra Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community