Chandrasekhar Bawankule: उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल, तर…; बावनकुळेंनी ‘हे’ ५ प्रश्न विचारून दिलं आव्हान

ही मुलाखत म्हणजे, काळू-बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल, तर आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं आहे.

161
Chandrasekhar Bawankule: उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल, तर...; बावनकुळेंनी 'हे' ५ प्रश्न विचारून दिलं आव्हान

उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका मुलाखतीतून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या मुलाखतीवरूनच माजी मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंची मुलाखत ही काळू-बाळूचा तमाशा असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. बावनकुळे यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’द्वारे ठाकरेंच्या मुलाखतीविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Chandrasekhar Bawankule)

भाजपाला राममुक्त करण्याची घोषणा करतानाच भाजपाला देशातील प्रश्न दिसत नाही. त्यांना फक्त उद्धव ठाकरे यांना संपवायचं आहे तसेच या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्य म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरेंना ५ प्रश्नही विचारले आहेत. (Chandrasekhar Bawankule)

(हेही वाचा – Badrinath Dham: उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला सुरुवात; गेल्या ८ वर्षांत किती भक्तांनी घेतलं दर्शन ?)

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे, काळू-बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल, तर आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं आहे.

भाजपाचे पाच प्रश्न –
१. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या कॉंग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?
२. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता? हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?
३. सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा कॉंग्रेसचा मनसुबा आहे, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात ?
४. राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?
५. उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?

उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे, असं आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या प्रश्नांची उत्तरे देतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Chandrasekhar Bawankule)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.