जगात युक्रेन-रशिया आणि इस्रायल-हमास युद्धांमुळे शस्रास्रांच्या बाजारात चांगळी खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या काळात सुरू झालेले युक्रेन-रशिया युद्ध गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायल-हमास युद्धानंतर आता शस्त्रास्त्रांचा बाजार सज्ज झाला आहे. यावर्षी २५० लाख कोटी रुपयांच्या शस्रास्त्रांची विक्री होण्याची शक्यता आहे. (Israel-Hamas Conflict)
आतापर्यंत जगातील शस्रास्त्रांची बाजारपेठ १८३ लाख कोटी रुपयांची आहे. त्यानुसार, यंदा शस्र खरेदीत ३७ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. हा आकडा देशांमधील अधिकृत शस्रास्र व्यवहारांच्या डेटाशी संबंधित असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे, पण जगभरात बेकायदेशीर शस्रास्र विक्रीचे जाळे आणि बाजारपेठही आहे.
(हेही वाचा – Asaduddin Owaisi : हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल; असदुद्दीन ओवैसी यांचे आव्हान)
दुसऱ्या महायुद्धानंतरचे युरोपातील पहिले मोठे युद्ध
३० वर्षांत प्रथम युरोपमध्ये शस्रास्र खरेदी १३ टक्क्यांनी वाढली. फेब्रुवारी २०२२मध्ये सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे युरोपातील पहिले मोठे युद्ध आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायल-हमास युद्धामुळे शस्रास्र खरेदीची शर्यत वाढली आहे. इस्रायलकडे स्वत:च्या बळावर शस्रास्रांचा मोठा साठा आहे, तर इराण आणि इतर आखाती देशांनी हमासच्या बाजूने आपला साठा उघडला आहे.
शस्रास्रांची बाजारपेठ
शस्रास्रांच्या बाजारपेठेत नवीन देश प्रवेश करत आहेत. यामध्ये स्वीडन, तुर्की, दक्षिण कोरिया, चीन आणि इराण यांचा समावेश आहे. भारताचाही आता यामध्ये समावेश होत आहे. जे देश शस्रास्रे विकण्यात आघाडीवर होते. त्यांनी शस्रास्रांच्या क्षेत्रात संशोधनपर काम केले आहे. युद्धाच्या वेळी केवळ शस्रास्रे विकली जात नाहीत, तर युद्धाचे आख्यान मांडून युद्धाचा कृत्रिम धोकाही निर्माण केला जातो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community