Coronation Year: ३५०वा शिवराज्याभिषेक वर्षसोहळा, ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘शिवचरित्रा’वर भव्य उपक्रमाचे आयोजन

शिवचरित्रातील आचार, विचार, संस्कारांनी प्रेरित ४ दिवसीय भव्य उपक्रमास आपण सर्वांनीच आपल्या कुटुंबियांसहित, मित्रपरिवारांसहित भेट द्यावी तसेच शाळा, महाविद्यालये आणि परिसरातील तरुण पिढीने याचा जरूर लाभ घ्यावा.

146
Coronation Year: ३५०वा शिवराज्याभिषेक वर्षसोहळा, 'छत्रपती शिवाजी महाराज' आणि 'शिवचरित्रा'वर भव्य उपक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘राज्याभिषेक’ हा भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा प्रसंग. राज्याभिषेकावेळी महाराजांनी ‘छत्रपती’ हे पद धारण केले. यंदा ३५०वा शिवराज्याभिषेक वर्षसोहळा साजरा होत आहे. यानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या सहकार्याने आणि सईशा प्रोडक्शन्स, मुंबई निर्मित व प्रस्तुत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि “शिवचरित्र” या विषयांना संपूर्णतः वाहिलेल्या ४ दिवसीय भव्य उपक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर येथे करण्यात आलेले आहे. (350th Coronation Year)

सदर उपक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे असेल :-

१. शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालन – संपूर्ण शिवचरित्र, आपली संस्कृती, आपले गडदुर्ग, शिवकाळातील परिचित-अपरिचित योद्धे आणि अशा सर्वच विषयांवर आधारित १०० चित्रकाव्यांचे भव्य कलादालन ४ दिवस म्हणजेच दि. २३, २४, २५, २६ मे २०२४ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये उभारण्यात येणार आहे. सकाळी १० वा. ते रात्रौ ८ वाजेपर्यंत हे दालन सर्वांसाठी खुले असेल. (प्रवेश विनामूल्य आहे.) (350th Coronation Year)

२. “संगीत शिवस्वराज्यगाथा” या संपूर्ण शिवशाहीवर आधारित ४२ नवगीतांमधून साकारलेल्या धगधगत्या संगीतमय शिवचरित्राचे सादरीकरण रविवार दि. २६ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर येथे असेल. गायक श्रीरंग भावे, नचिकेत देसाई, दीप्ती आंबेकर, अनिल नलावडे हे असतील, तर ओघवत्या शैलीतील शिवचरित्र कथन पद्मश्री राव यांचे असेल. शिवकाव्यांचे सादरीकरण हे स्वतः अनिल नलावडे करतील. या गीतांना भव्य एलईडी स्क्रीनवर जुन्या ऐतिहासिक चलचित्रांची साथसोबत असेल. ( प्रवेश विनामूल्य. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य).

अधिक माहितीसाठी – 
अशा या शिवचरित्रातील आचार, विचार, संस्कारांनी प्रेरित ४ दिवसीय भव्य उपक्रमास आपण सर्वांनीच आपल्या कुटुंबियांसहित, मित्रपरिवारांसहित भेट द्यावी तसेच शाळा, महाविद्यालये आणि परिसरातील तरुण पिढीने याचा जरूर लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे, आपल्या व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया ग्रुप्सवर सदर उपक्रमाची माहिती नक्की शेयर करावी. जेणेकरून हे राष्ट्रकार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य लाभावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि सईशा प्रोडक्शन्स, मुंबई यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क पद्मश्री राव, सईशा प्रोडक्शन्स, मुंबई यांना ९८२१५५४१३० या क्रमांकावर संपर्क साधावा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.