पुन्हा दिल्ली मेट्रोच्या भिंतींवर ‘खलिस्तान झिंदाबाद’ लिहिले; Gurpatwant Singh Pannu ने घेतली जबाबदारी

लोकसभा निवडणूक 2024 चे तीन टप्पे पार पडले आहेत आणि चौथ्या टप्प्यासाठी प्रचाराचा टप्पा जोरात सुरू आहे, त्यामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील वातावरणात असे कृत्य केल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

142

खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी दिल्ली मेट्रोला लक्ष्य केले आहे. दिल्ली मेट्रोच्या भिंतींवर खलिस्तानच्या समर्थनार्थ ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा लिहिण्यात आल्या. हे कृत्य कोणी केले याबाबत अद्याप काहीही माहिती नाही, मात्र सिख फॉर जस्टिस (एसएफजे) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने याची जबाबदारी घेतली आहे. तो अमेरिकेत लपला आहे.

लोकसभा निवडणूक 2024 चे तीन टप्पे पार पडले आहेत आणि चौथ्या टप्प्यासाठी प्रचाराचा टप्पा जोरात सुरू आहे, त्यामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील वातावरणात असे कृत्य केल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पंजाबमध्ये 1 जून 2024 रोजी 13 जागांसाठी निवडणूक होणार आहे, हा सातवा आणि शेवटचा टप्पा असेल. त्यानंतर निवडणुकीचा निकाल ३ दिवसांनी जाहीर होणार आहे. पंजाबमध्ये मुख्य लढत राज्यातील सत्ताधारी आप, काँग्रेस, देशातील दुसरा सर्वात जुना पक्ष एसएडी (शिरोमणी अकाली दल) आणि भाजप यांच्यात आहे.

(हेही वाचा Hardeep Singh Nijjar च्या हत्येप्रकरणी आणखी एका भारतीयाला अटक)

खलिस्तानी घोषणा लिहिण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळताच, टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. तिथे लिहिलेल्या देशविरोधी घोषणा सध्या पुसल्या गेल्या आहेत. हे कृत्य कोणाचे आहे याचा तपास पोलीस करत आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. दिल्ली पोलिसांनी एफआयआरही नोंदवला आहे. गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची जबाबदारी घेतली आहे, ज्याच्या हत्येचा कटावरून अमेरिकेने भारतावर खोटा आरोप केला होता.

याआधी कुठे कुठे खलिस्तानच्या घोषणा दिल्या?  

अमेरिकेकडे आपल्या दाव्याचे समर्थन करणारे पुरावे नाहीत, असेही रशियाने म्हटले आहे. मात्र, राष्ट्रीय राजधानीत खलिस्तानी घोषणा लिहिण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावर्षी मार्च महिन्यात पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग मेट्रो स्टेशनच्या खांबांवर खलिस्तानी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. त्यावेळीही दिल्ली पोलिसांनीही गुन्हा दाखल केला होता. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनादरम्यान उत्तम नगर येथील सरकारी शाळेच्या भिंतीवर अशा घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.