पाकिस्तान POK वरील नियंत्रण गमावतोय; भारतात विलीन होण्यासाठी नागरिकांचा उठाव

364

पाकव्याप्त काश्मीरातील (POK) जनतेने पाकिस्तान पोलीस आणि प्रशासनाकडून होणाऱ्या क्रूर अत्याचाराविरोधात बंड पुकारले आहे. पाकिस्तानी पोलीस येथील जनतेचा आवाज दाबण्यासाठी आणि लाठी चार्ज आणि गोळीबारही करत आहे. पोलिसांकडून झालेल्या या हिंसाचारात एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर, संतप्त जमावाने एका पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. मुझफ्फराबाद आणि रावळकोट येथे स्थानिक लोक आणि पोलीस अधिकारी यांच्यात झटापट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

(हेही वाचा पुन्हा दिल्ली मेट्रोच्या भिंतींवर ‘खलिस्तान झिंदाबाद’ लिहिले; Gurpatwant Singh Pannu ने घेतली जबाबदारी)

हिंसक निदर्शने 

अलीकडील निदर्शने आणि हिंसक दडपशाहीचा विचार करता, पाकिस्तान अनेक दशकांपासून बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेल्या भागावरील पकड गमावताना दिसत आहे. एवढेच नाही तर, रावळकोटमध्ये, भारतात पुन्हा विलीनीकरणाची मागणी करणारे पोस्टर्स देखील लावण्यात आले आहेत. पाकव्याप्त काश्मीरा (POK) तील या निदर्शकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधूराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. यानंतर लोक आणखी भडकले आणि त्यांनी या निदर्शनाने हिंसक वळण घेतले. ‘पाकिस्तान पीओकेवरील  (POK) आपले नियंत्रण गमावताना दिसत आहे आणि तो पुन्हा एकदा भारताचा भाग होण्याच्या जवळ पोहोचला आहे. यादरम्यान जमावाने एका लष्करी गुप्तचर वाहनाचीही तोडफोड केली. जम्मू काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीने हे आंदोलन सुरू केले आहे. पाकिस्तान सरकारने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या कराराचे पालन न केल्याने, कमिटीने या संपूर्ण परिसरात ‘बंद आणि चक्का जाम’चे आवाहन केले होते. वीजबिलावर लावण्यात आलेल्या अन्याय कारक कराच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या कमिटीच्या वतीने ऑगस्ट 2023 मध्येही करांबाबत संप पुकारला होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.