सध्या आम्ही वेगळे पक्ष आहोत. मात्र इंडि आघाडीत (INDIA Alliance) आम्ही पक्ष म्हणून एकत्र आहोत. भविष्यात काय होते, ते पाहू. मात्र काँग्रेस (Congress) सोडून जे लोक गेले आहेत, ते परतत असतील, तर आम्ही स्वागत करू त्यांचे. एकच पक्ष नाही, देशात अनेक पक्ष आहेत, जे काँग्रेसमध्ये होते आणि ते परतणार असतील तर आम्ही रेड कार्पेट टाकून स्वागत करु. आम्हाला वाटतं की, विचारधारा एकच असेल, तर वेगळं कशाला राहायचे ?, असा प्रश्न शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी केला आहे.
(हेही वाचा – Lokhandwala Mumbai : लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील 10 रेस्टॉरंट्स)
काय म्हणाले होते शरद पवार ?
महाराष्ट्रातले दिग्गज नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाची दोन शकले झाली आहेत. शिवसेनाही राष्ट्रवादीच्या एक वर्ष आधी फुटली आहे. या सगळ्यानंतर काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत वक्तव्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election 2024) प्रादेशिक पक्ष एकत्र येतील आणि काँग्रेसमध्ये विलीन होतील. पुढच्या २ वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसशी जवळीक साधतील किंवा त्यातले काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील. काँग्रेसमध्ये विलीन होणे, हा चांगला पर्याय आहे, असे काही पक्षांना वाटू शकते. आमच्या आणि काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही. आमच्या विचारधारा गांधी-नेहरू यांच्या विचारांवर वाटचाल करत आहेत, असे वक्तव्य शरद पवार यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ
शरद पवार यांना जेव्हा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले की, याबाबत मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय काहीही सांगू शकत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. पुढच्या काळातले निर्णय आणि रणनीती हे सामूहिकपणे विचार करून घेतले जातील. आम्हाला नरेंद्र मोदींशी जुळवून घेणे कठीण आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
त्यावरून विविध चर्चांना उधाण आलं. ४ जूननंतर शरद पवार त्यांच्याकडे उरलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील का, याची चर्चा आता चालू झाली आहे. या चर्चांवर आता काँग्रेस खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी उत्तर दिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community