लोकसभा २०२४ (Lok sabha Election 2024) च्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी पार पडणार आहे. यासंबंधी चौथ्या टप्प्यातील प्रचारसभांचा तोफा शनिवारी थंडावल्या. राज्यात ११ मतदारसंघात मतदान पार पडणार आहेत. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झालंय. सोमवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात होईल. पण मतदानाच्या एक दिवस आधी अहमदनगरमध्ये (Ahmednagar) एक अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. त्यामुळे पोलीसही सतर्क झाले आहे. (Ahmednagar)
(हेही वाचा – Aurora Forecast : जगातील सर्वात मोठे सौर वादळ; रंगांनी भरून गेले आकाश)
अहमदनगर जिल्ह्यात दोन गटात हाणामारी झाली असून, ही हाणामारी वैयक्तिक कारणातून झाल्याची माहिती समोर येत आहे. या वादातून वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आलीय. शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा माजी नगरसेवक सचिन जाधव (Sachin Jadhav) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सागर मुर्तडकर (Sagar Murtadkar) यांच्या गटात ही हाणामारी झालीय. दगडफेकीत सागर मुर्तडकर यांचे कार्यालय फुटले आहे. तसेच एक स्कार्पिओदेखील फोडण्यात आलीय. अहमदनगरच्या मंगलगेट परिसरात ही हाणामारी झाली आहे. हाणामारी संदर्भात अशी माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा – Loksabha Election 2024 : सोमवारी १० राज्यांमधील ९६ मतदारसंघांत मतदान; जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख लढती)
अहमदनगरमधील मुर्तडकर आणि जाधव यांच्यात पूर्वीपासून वैर असल्याची माहिती मिळाली आहे. हाणामारीनंतर नगरमधील वातावरण तापले आहे. परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे. (Ahmednagar)
हेही पाहा –