आयएनएस किल्तानचे 12 मे रोजी व्हिएतनाममधील कॅम रान्ह बे येथे आगमन झाले आणि व्हिएतनाम पीपल्स नेव्ही आणि भारतीय दूतावासाने त्याचे अगत्यपूर्वक स्वागत केले. ही भेट भारतीय नौदलाच्या पूर्वेकडील ताफ्याच्या परिचालनात्मक तैनातीचा एक भाग आहे. या भेटीमुळे दोन्ही सागरी राष्ट्रांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्य अधिक दृढ होईल.
भारत आणि व्हिएतनाममध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आहे. हे संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदल (Indian Navy) जहाज किल्तानची भेट व्यावसायिक संवाद, क्रीडा, सामाजिक देवाणघेवाण आणि दोन्ही नौदलांची सामायिक मूल्ये प्रतिबिंबित करणारे सामाजिक संपर्क या कार्यांवर केंद्रित आहे. भारतीय नौदल (Indian Navy) आणि व्हिएतनाम पीपल्स नेव्ही यांच्यात समुद्रातल्या सागरी भागीदारी प्रात्यक्षिकाने या भेटीची सांगता होईल. या प्रात्यक्षिकामुळे आंतर क्रियान्वयन आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण वाढेल.
(हेही वाचा – Loksabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात 17.7 कोटी मतदार करणार उमेदवारांचे भविष्य सीलबंद)
आयएनएस किल्तान हे एक स्वदेशी पाणबुडीविरोधी संरक्षक युद्धनौका असून याची रचना भारतीय नौदलाच्या नौदल संचालनालयाने केली आहे आणि बांधणी कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE) यांनी केली आहे. आयएनएस किल्तान हे चार P28 युद्धजन्य पाणबुडीविरोधी (ASW) युद्धनौकांच्या श्रेणीतले तिसरे जहाज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community