बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या बाईला तुम्ही पक्षाचे प्रवक्ते केले; Raj Thackeray यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

फोडाफोडीचे राजकरण पहिल्यांदा शरद पवारांनी सुरु केले. आधी काँग्रेसला फोडली, पुढे छगन भुजबळाला फोडून शिवसेना फोडली, असे राज ठाकरे म्हणाले.

267
Raj Thackeray यांनी मांडली PM Narendra Modi यांच्यासमोर मुंबई महाराष्ट्राच्या विकासाची पंचसुत्री

तुम्ही म्हणता माझे वडील चोरले, पण ज्या वडिलांवर तुमचे प्रेम आहे असे म्हणतात, ते कसे आहे ही मी दाखवतो तो व्हिडीओ पाहून बघा. आज पुन्हा लाव ते व्हिडिओ काढतो, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी उबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या जुन्या भाषणाची क्लिप दाखवली. त्यात त्यांनी ‘वय झालेल्या बाळासाहेबांच्या हातात तलवार देऊन काय उपयोग, थरथर कापत असलेल्या हातात तलवार शोभते का’, असे म्हणते आहेत. अशा बाईला तुम्ही पक्षाच्या प्रवक्त्या करता आणि वडिलांवर प्रेम आहे असे म्हणता, असा हल्लाबोल केला.

तेव्हा शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक खोके देऊन फोडले, ते काय होते? 

लोकसभा निवडणुकीतील कल्याण लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते. ही एकमेव पहिली निवडणूक बघतोय कि ज्यात विषयच नाही. मला जेव्हा राजकारणाची उमज आली, तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत विषय होता, हे मी पाहिले आहे. कोणताही विषय नसल्यामुळे सगळेजण आई-बहिणींचा उद्धार करत आहेत. वडील चोरले यावर निवडणूक सुरु आहे. आज जे आमचा पक्ष फोडला बोलत आहेत, ते आघाडीत एकत्र बसले. त्यांनी एकमेकांकडे बघावे. त्याच उद्धव ठाकरे यांनी मनसेचे सहा नगरसेवक खोके देऊन फोडले होते. मागितले असते तर दिले असते, असे राज ठाकरे ( Raj Thackeray) म्हणाले.

(हेही वाचा Raj Thackeray यांच्या निशाण्यावर मुंब्रा; अतिरेकी संघटनांची यादीच वाचून दाखवली)

फोडाफोडीचे राजकारण पहिल्यांदा शरद पवारांनी सुरु केले 

त्या उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर शरद पवार बसले आहेत. फोडाफोडीचे राजकरण पहिल्यांदा शरद पवारांनी सुरु केले. आधी काँग्रेसला फोडली, पुढे छगन भुजबळाला फोडून शिवसेना फोडली. त्याच्यानंतर नारायण राणे यांना घेऊन काँग्रेसने शिवसेना फोडली. आजचे नेतृत्व तेव्हा टाहो फोडताना दिसले नाही. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली, त्यांच्या सोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसताना तुम्हाला काही वाटले नाही. मी पक्षातून बाहेर पडताना बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. तेव्हा निश्चय केला होता, बाळासाहेबांच्या शिवाय कोणच्याही हाताखाली काम करणार नाही. दोन-अडीच वर्षांचा काळ पहा, तुम्ही एकत्र निवडणूक लढवली होती ना, निकाल लागल्यावर जेव्हा आपल्याशिवाय सरकार बसत नाही हे लक्षात आल्यावर अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची टूम काढली. प्रचारात फडणवीस पुढचा मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शाह सांगत असताना, तेव्हाच का विरोध केला नाही? लाखो लोकांची मते वाया घालवली. २०१९ नंतर जो गोंधळ उडाला तो तुमच्या महत्वाकांक्षेपायी उडाला आहे. मोदींच्या ज्या गोष्टी पटल्या नाही त्यांना मी विरोध केला, माझा विरोध मुद्द्यांना होता. आज उद्धव ठाकरे मोदींच्या विरोधात बोलत आहेत, समजा भाजपने अडीच वर्षे मान्य केले असते तर बोलला असतात का, नसते बोलला असता. पण राज ठाकरेचे असे नाही, असेही राज ठाकरे ( Raj Thackeray) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.