- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मोदीजींची (PM Narendra Modi) विकास गंगा सगळया घटकांसाठी घरोघरी पोचली आहे. मानखुर्द परिसरात एक विशिष्ट समाजाची शक्ती तबलीघी लोक येऊन बसलेत. घरोघरी जाऊन सागंत आहेत कि, काहीही करा मोदीजींना थांबवा. त्यामुळे आपल्यासमोर दोनच पर्याय आहे. एकतर मोदीजींचा विकास (PM Narendra Modi) किंवा उबाठा (UBT) यांची गुंडशाही. त्यामुळे आपण सर्वानी पुढील आठ दिवसात सर्वाना जागरूक करून आपण तसेच सर्व हिंदूंनी एकत्र येऊन मतदान करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा (Mihir Kote) यांनी विक्रोळी येथील सभेत केले. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यावेळी उपस्थित होते. (Mihir Kote)
मिहिर कोटेचा (Mihir Kote) हे आपल्या भाषणात म्हणाले की, जेव्हा मी मानखुर्द मध्ये प्रचार करायला जातो तेव्हा एकदा नाहीतर तीनदा आपल्या प्रचार रॅलीवर दगडफेक केली जाते. कारण ह्यांना मोदीजींची भीती आहे. कारण मोदीजींची (PM Narendra Modi) विकास गंगा सगळया घटकांसाठी घरोघरी पोचली आहे. (Mihir Kote)
विरोधकांनी व्होट जिहादचा एक नवीन पॅटर्न सुरु केला आहे. म्हणून सर्व हिंदूंनी एकत्र येऊन मतदान करणे गरजेचे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, लोकांना सांगा २० मे रोजी एक दिवस कोटेचा यांना आशीर्वाद देण्यासाठी घरातून बाहेर पडा आणि येणारे पाच वर्ष कोटेचा तुमच्या सेवेत हजर राहणार असल्याचे सांगितले. मी निवडून आल्यानंतर मुलुंड टर्मिनस, डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी बंद करणे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि सांस्कृतिक केंद्र उभारणार याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. (Mihir Kote)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community