Devendra Fadanvis : मुंबईतून मराठी माणूस हद्दपार!, फडणवीस यांनी कुणावर साधला निशाणा

Devendra Fadanvis : मागील २५ वर्षे उध्दव यांच्याकडे मुंबई महापालिकेची सत्ता आहे. या २५ वर्षात त्यांनी मुंबईसाठी काय केले? ज्यांच्या नावे मत मागितले त्या मराठी माणसासाठी काय केले, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनीच मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केले, असा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

167
Devendra Fadanvis : मुंबईतून मराठी माणूस हद्दपार!, फडणवीस यांनी कुणावर साधला निशाणा
Devendra Fadanvis : मुंबईतून मराठी माणूस हद्दपार!, फडणवीस यांनी कुणावर साधला निशाणा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 
निवडणुका आल्या की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार असे एकच भावनिक आवाहन करायची सवय उद्धव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आहे. मागील २५ वर्षे उध्दव यांच्याकडे मुंबई महापालिकेची सत्ता आहे. या २५ वर्षात त्यांनी मुंबईसाठी काय केले? ज्यांच्या नावे मत मागितले त्या मराठी माणसासाठी काय केले, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनीच मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केले, असा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला.
ईशान्य मुंबईचे उमेदवार आमदार मिहिर कोटेचा (Mihir Kote) यांच्या प्रचारार्थ विक्रोळी येथे आयोजित जाहीर सभेत केली. या जाहीर सभेत फडणवीस यांनी मिहिर कोटेचा यांचा जाहीरनामा तथा कर्तव्यनामा प्रकाशित केला. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचे वारसदार उध्दव ठाकरे (uddhav thackeray) नाहीत, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी जाहीर केले होते, ज्या दिवशी काँग्रेससोबत युती करण्याची पाळी येईल, तेव्हा शिवसेना बंद करेन. पण उद्धव यांनी तर काँग्रेससोबत (Congress) युती केली.  (Devendra Fadanvis)
उध्दव ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार!
मातोश्री ज्या मतदारसंघात आहे तेथे महविकास आघाडीतर्फे काँग्रेसचा (Congress) उमेदवार उभा आहे. याचा अर्थ उद्धव हाताच्या पंजाला मत देणार. म्हणूनच उध्दव हे बाळासाहेब यांच्या संपत्तीचे वारसदार असू शकतील,पण त्यांच्या विचारांचे मुळीच नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी  केली.
फडणवीस यांनी घेतली स्वतःवर जबाबदारी!
मिहिर यांनी मनावर घेतलेली विकास कामे पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच मिहिर कोटेचा (Mihir Kote) यांना मत म्हणजे विकासाला मत आणि विकासपुरुष नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मत, असेही त्यांनी स्पष्ट केले. सभेस उपस्थित गर्दी पाहून फडणवीस यांनी ईशान्य मुंबईतील निवडणुकीचा निकाल मिहिर कोटेचा यांच्या बाजूने आजच जाहीर झाला, असे घोषित केले. (Devendra Fadanvis)
उध्दव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर
 महाराष्ट्रातील उद्योग म्हणे गुजरातला हलवले, प्रत्यक्षात उद्धव मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत( एफ डी आय) चौथ्या क्रमांकावर घसरला. मात्र महायुतीचे सरकार परतताच गुजरात व अन्य राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमंकावर आले, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadanvis)
तेव्हा मी नकार दिला होता, पण उध्दव ठाकरेंचा हट्ट होता…
उध्दव यांचे पोलिसच जर बड्या उद्योगपतीच्या घराजवळ बॉम्ब पेरणार असतील तर राज्यात उद्योग टिकतील कसे, असा प्रश्न उपस्थित करत फडणवीस यांनी मुकेश अंबानी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांचे उदाहरण दिले. मुख्यमंत्री होताच वाझेला पोलीस दलात घ्या, अशी मागणी उध्दव सतत करत होते. मी नकार दिला होता. पण त्यांचा हट्ट होता. अखेर हाच वाझे अंबानी प्रकरणात सापडला, असे फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadanvis)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.