IPL 2024, RCB vs DC : बंगळुरूचा दिल्लीवर ४७ धावांनी विजय, दिल्ली स्पर्धेतून बाद, बंगळुरूला अजूनही बाद फेरीची आशा

IPL 2024, RCB vs DC : बंगळुरू संघाचा हा सलग पाचवा विजय होता

133
IPL 2024, RCB vs DC : बंगळुरूचा दिल्लीवर ४७ धावांनी विजय, दिल्ली स्पर्धेतून बाद, बंगळुरूला अजूनही बाद फेरीची आशा
IPL 2024, RCB vs DC : बंगळुरूचा दिल्लीवर ४७ धावांनी विजय, दिल्ली स्पर्धेतून बाद, बंगळुरूला अजूनही बाद फेरीची आशा
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये बाद फेरीची चुरस आता चांगलीच रंगात आली आहे. कारण, काही संघांसाठी प्रत्येक पराभव हा स्पर्धेतून आव्हान संपवणारा आहे. जसं रविवारी दिल्ली कॅपिटल्सचं झालं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (IPL 2024, RCB vs DC) संघाने त्यांचा ४७ धावांनी पराभव केला. आणि त्यामुळे बंगळुरू संघाच्या बाद फेरीच्या आशा कायम राहिल्या आहेत. तर दिल्लीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. बंगळुरूचे सलग पाचव्या विजयानंतर १३ सामन्यांतून १२ गुण झाले आहेत. शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नईचा मोठ्या फऱकाने पराभव करत बाद फेरी गाठण्याची आशा त्यांना आहे.  (IPL 2024, RCB vs DC)

(हेही वाचा- Devendra Fadanvis : मुंबईतून मराठी माणूस हद्दपार!, फडणवीस यांनी कुणावर साधला निशाणा)

दिल्लीविरुद्ध बंगळुरूने (IPL 2024, RCB vs DC) चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं. पहिली फलंदाजी करताना त्यांनी ९ बाद १८७ धावा केल्या त्या रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) ३२ चेंडूंत ५२ धावा. विल जॅक्सच्या (Will Jacks) २९ चेंडूंत ४१ धावांच्या खेळीमुळे. विराट कोहलीने (Virat Kohli) सुरुवातीला २७ तर कॅमेरुन ग्रीनने (Cameron Greene) नाबाद ३२ धावा केल्या. या जोरावरच बंगळुरू संघ १८७ धावसंख्या गाठू शकला. कारण, एरवी बाकीचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत होते. शेवटच्या ४ फलंदाजांनी तर फक्त १७ धावांची भर घातली. पण, ग्रीनने शेवटपर्यंत किल्ला लढवत संघाला १८० धावांचा टप्पा गाठून दिला. (IPL 2024, RCB vs DC)

ग्रीननेच नंतर १९ धावांत एक बळीही मिळवला. त्यामुळे त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

दुसऱ्या डावात दिल्लीचा डाव मात्र उभाच राहू शकला नाही. डेव्हिड वॉर्नर (David Warner) एका धावेवर बाद झाला. तर घणाघाती मॅकगर्क २१ धावांवर दुर्दैवीरित्या धावचीत झाला. त्यानंतर फलंदाजांची तंबूत परतण्याची रिघच लागली. शाय होपच्या २९ आणि तात्पुरता कर्णधार अक्षर पटेलच्या (Akshar Patel) ५७ धावा सोडल्या तर दुसऱ्या बाजूने त्यांना एकही फलंदाज साथ देऊ शकला नाही. अखेर दिल्लीचा संघ विसाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सर्वबाद झाला.  (IPL 2024, RCB vs DC)

(हेही वाचा- Phase 4 Lok Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड!)

बंगळुरूतर्फे यश दयालने (Yash Dayal) २० धावांत ३ बळी टिपले. तर लॉकी फर्ग्युसननेही २३ धावांत २ बळी घेतले. कॅमेरून ग्रीनने (Cameron Greene) त्याच्या ४ षटकांत केवळ १९ धावा देत एक बळीही टिपला. बंगळुरू संघाला आता बाद फेरीत जाण्यासाठी शेवटच्या सामन्यात चेन्नईचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल. (IPL 2024, RCB vs DC)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.