Lok Sabha Election 2024: रावेरमध्ये अचानक सुरू झालेल्या पावसाने मतदारांसहित पोलिसांची झाली धावपळ!

127
Lok Sabha Election 2024: रावेरमध्ये अचानक सुरू झालेल्या पावसाने मतदारांसहित पोलिसांची झाली धावपळ!
Lok Sabha Election 2024: रावेरमध्ये अचानक सुरू झालेल्या पावसाने मतदारांसहित पोलिसांची झाली धावपळ!

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा (Lok Sabha Election 2024) आज (१३ मे) महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. आज महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, अहमदनगर, शिर्डी, बीड या ठिकाणी मतदान पार पडतं आहे. महाराष्ट्रात सध्या मान्सून पूर्व पावसाची हजेरी (Pre-Monsoon Rain) पाहायला मिळत आहे. राज्यात पुढील 24 तासातही जोरदार पावसाची शक्यता (Unseasonal Rain) वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचं सावट हे कायम आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा –Phase 4 Lok Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड!)

रावेर शहरात पावसाला सुरूवात झाली आहे. रावेरमधील सौ. कमलाबाई यश अग्रवाल गर्ल्स हायस्कूलच्या मतदान केंद्रावर पाऊस सुरू झाला. त्यानंतर मतदारांसह बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. प्रचंड ढगांच्या गडगडात पाऊस सुरू झाला. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा –Phase 4 Lok Sabha Election 2024: चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू! महाराष्ट्रातील ११ मतदासंघात मतदान)

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यासोबतच, मुंबई, पालघरमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाजही आयएमडीमने दिला आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.