राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या 11 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मात्र अनेक मतदान केंद्रांत मतदार आणि केंद्राबाहेर नेमलेल्या पोलिसांमध्ये मोबाईल मतदान केंद्रात नेण्यावरुन वाद पाहायला मिळाला. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा –Flood In Indonesia: इंडोनेशियामध्ये पावसाचा हाहाकार! थंड लाव्हामुळे ३७ जणांचा मृत्यू)
मोबाईल मतदान केंद्रात (Lok Sabha Election 2024) आणू नये असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानापूर्वी प्रसारमाध्यमांतून केले होते. मात्र नागरिकांपर्यंत ही जनजागृती न झाल्याने अनेक मतदार मोबाईल घेऊन मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत गेले. परंतु प्रवेशव्दारावरील सुरक्षा यंत्रणांनी मतदारांना मोबाईल ठेऊन या असे बजावल्यानंतर पोलीस व मतदार यांच्यात वाद झाल्याचे चित्र सर्वच मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर दिसत होते. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा –तर ठरलं Shivaji Park चे रहिवासी मतदानावरील बहिष्कार मागे घेणार ; हे आहे कारण… )
अनेक ठिकाणी मतदान केंद्रात (Lok Sabha Election 2024) चालत आलेल्या मतदारांना पुन्हा फोन घरी ठेवण्यासाठी जावे लागल्याने अनेक मतदार घरी परतत असताना दिसत होते. काही मतदान केंद्रात पोलीसांकडे मतदारांचे मोबाईल बाळगण्यासाठी ठेवण्यात आले होते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी असे करु नका असे सांगितल्याचे पाहायला मिळाले. अखेर सकाळी आठ वाजल्यानंतर मतदानाचा ओघ कमी झाल्याने काही मतदान केंद्रात मोबाईल बंद करुन जाण्याची मुभा देण्यात मतदारांना देण्यात आली. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community