Rahul Dravid : राहुल द्रविड प्रशिक्षक पदासाठी अर्ज करणार की नाही?

Rahul Dravid : राहुल द्रविड यांचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपत आहे 

155
Rahul Dravid : राहुल द्रविड राजस्थान रॉयल्समध्ये परतणार?
  • ऋजुता लुकतुके

बीसीसीआयचे  सचिव जय शाह (Jai Shah) यांनी गेल्याच आठवड्यात भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीच्या बाबतीत काही गोष्ट स्पष्ट केल्या. त्यानुसार, सध्याचे यशस्वी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना मुदत वाढ मिळणार नाही आहे. त्यांना प्रशिक्षक पदी कायम राहायचं असेल तर पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. बीसीसीआय (BCCI) टी-२० (T-20) विश्वचषकाच्या आसपास नवीन अर्जही मागवणार आहे. अगदी परदेशी क्रिकेटपटूही या पदासाठी अर्ज करू शकतो. (Rahul Dravid)

राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि भारतीय संघ यांच्यात मागच्या तीन वर्षांत एक नातं तयार झालं आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी, एकदिवसीय विश्वचषकात सलग १३ सामने जिंकण्याबरोबरच अंतिम फेरीत मारलेली मजल असा प्रवास संघाने एकत्र केला आहे. म्हणूनच बीसीसीआयने विचारपूर्वक टी-२० (T-20) विश्वचषकापर्यंत द्रविड (Rahul Dravid) यांना मुदतवाढ दिली होती. पण, तो कार्यकाळही आता संपणार आहे. खुद्द द्रविड प्रशिक्षकपदासाठी इथून पुढे इच्छूक असतील का हा ही प्रश्नच आहे.  (Rahul Dravid)

(हेही वाचा- IPL 2024, Playoffs Scenario : बाद फेरीसाठी बंगळुरू वि चेन्नई सामन्याचं गणित काय आहे)

त्यामुळे नवीन अर्ज मागवले तर द्रविड त्यासाठी अर्ज करणार का?

नवीन करार हा किमान तीन वर्षाचा असेल. आणि इतक्या कालावधीसाठी द्रविड उत्सुक नाहीत, असं खात्रीलायकरित्या समजतंय. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, राहुल द्रविड (Rahul Dravid) मुदत वाढवण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. आणि त्यामुळे ते पुन्हा अर्ज करणार नाहीत. शिवाय क्रिकेटमधील प्रत्येक प्रकारासाठी वेगळा प्रशिक्षक असंही बीसीसीआयला नको आहे. त्यामुळे संघासाठी प्रशिक्षकाला पूर्ण वेळ द्यावा लागणार आहे. या गोष्टीचाही द्रविड यांनी विचार केला आहे. (Rahul Dravid)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याचा ‘मोठा’ निर्णय)

प्रशिक्षक नेमण्याचा अधिकार हा बीसीसीआयच्या क्रिकेट समितीचा असेल. आणि त्या निर्णयात ढवळाढवळ करणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. आणि राहुल द्रविड यांच्याशी सचिव जय शाह यांनी चर्चा केली असल्याचीही शक्यता आहे. (Rahul Dravid)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.