PM Road Show मध्ये दिसणार संपूर्ण देशाची झलक; 10 लाख लोक सहभागी होणार

PM Road Show : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी सायंकाळी वाराणसी येथील बाबा विश्वनाथच्या नगरीत होणारा मेगा रोड शो 'न भुतो न भविष्यती' असा बनविण्याची योजना भाजपाने आखली आहे.

172
PM Road Show मध्ये दिसणार संपूर्ण देशाची झलक; 10 लाख लोक सहभागी होणार
PM Road Show मध्ये दिसणार संपूर्ण देशाची झलक; 10 लाख लोक सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा सोमवारी सायंकाळी वाराणसी येथील बाबा विश्वनाथच्या नगरीत होणारा मेगा रोड शो (PM Road Show) ‘न भुतो न भविष्यती’ असा बनविण्याची योजना भाजपाने आखली आहे. सहा किमीच्या या रोड शो मध्ये 10 ब्लॉक बनविण्यात आले आहेत. यात मराठी, बंगाली, पंजाबी, बिहारी, गुजराती, मारवाडी, तमिळी अशा विविध समुदायांचे नागरिक पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत. वाराणसीतील 10 लाख लोकांना यात सामील करण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे. (PM Road Show)

(हेही वाचा- CSMT Subway : नूतनीकरणाच्या कामाची ‘स्टेप’ चुकली; नवीन लाद्यांवर आताच पडू लागलेत प्रवासी)

मोदी 14 मे रोजी उमेदवारी अर्ज भरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यापूर्वी सोमवारी सायंकाळी वाराणसीमध्ये (Varanasi) रोडशो केला जाणार आहे. हा रोड शो (PM Road Show) सहा किलोमीटर लांब असणार आहे. 10 लाख लोकांना त्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले जाणार आहे. (PM Road Show)

रोड शो ‘न भुतो न भविष्यती’ असा होणार

पंतप्रधानांच्या रोड शोला (PM Road Show) ‘न भुतो न भविष्यती’ बनविण्यासाठी भाजपा योजनाबद्ध पद्धतीने कार्य करत आहे. यासाठी मंत्री, खासदार, आमदार यांच्या नेतृत्वात 25 टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीमचे नेतृत्व यूपी सरकारचे 4 मंत्री, तीन खासदार आणि 14 आमदार करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) स्वत: तयारीवर लक्ष ठेवून आहेत. (PM Road Show)

(हेही वाचा- IPL 2024 Rohit Sharma : रोहित शर्मा कोलकात्याच्या प्रशिक्षकांबरोबर दिसल्यावर चर्चेला उधाण)

दशाश्वमेध घाटावर एक हजार ड्रोन तैनात

बाबा विश्वनाथाचे मंदिर वाराणसीच्या (Varanasi) दक्षिण विधानसभा मतदारसंघात येते. या ठिकाणी सर्वाधिक गर्दी जमणार आहे. वातावरण निर्मितीसाठी 9 मेपासून गंगेच्या दशाश्वमेध घाटावर एक हजार ड्रोन वापरून काशीचा विकास, मोठे प्रकल्प आणि मोदींचे ड्रीम प्रोजेक्ट दाखवले जात आहेत. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांच्या देखरेखीत सर्व तयारी सुरू आहे. (PM Road Show)

मराठी, गुजराती, बंगाली… पारंपरिक वेशभूषेत दिसणार

थोडक्यात, पंतप्रधानांचा रोडशो (PM Road Show) वाराणसीत होत असला, तरी यात संपूर्ण देशाची झलक दिसावी, अशी भाजपाची इच्छा आहे. यासाठी 10 ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी मराठी, गुजराती, बंगाली, माहेश्वरी, मारवाडी, तमिळ, पंजाबी इत्यादी समुदायातील लोक त्यांच्या पारंपारिक पोशाखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करणार आहेत. फुलांचा वर्षाव, ढोल-ताशांचा गडगडाट, शहनाईचा आवाज, शंखांचा ध्वनी आणि डमरू वाजविणारे पथक पंतप्रधानांचे खास स्वागत करणार आहेत. वेद आणि उपनिषद यातील मंत्रांच्या गजरात निघणाऱ्या रोड शोमध्ये संपूर्ण भारतासह आणि यूपीच्या संस्कृतीची झलक पहायला मिळणार आहे. (PM Road Show)

(हेही वाचा- Swati Maliwal : केजरीवालांच्या घरी महिला खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण)

मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रोडशोची सुरवात

महामानव पंडित मदनमोहन मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पंतप्रधानांच्या रोड शोला सुरुवात होईल. 13 मे रोजी सायंकाळी काशी हिंदू विद्यापिठाच्या सिंह गेटपासून सुरू होणाऱ्या रोड शोची सांगता श्री काशी विश्वनाथ मंदिरात होईल. (PM Road Show)

बाबा विश्वनाथाचे घेणार

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बाबा विश्वनाथ मंदिरात जावून आशीर्वाद घेतील. रोडवर काशीची संस्कृती दिसणार आहे. यासोबतच प्राचीन काळातील काशी आणि आताची काशी चित्रातून बघायला मिळणार आहे. पाच हजारांहून अधिक महिला पायी प्रवास करणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही सहभागी होणार आहेत. (PM Road Show)

(हेही वाचा- CBSE Result 2024: CBSE दहावी, बारावीचा निकाल लागला ; ८७.९८ टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल)

बनारसचे कलाकारांचे नेत्रदीपक लोकनृत्य, कर्णप्रिय लोकगीते

यासोबतच बनारसचे कलाकार ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत्य, लोकगीते आणि वैदिक मंत्रांचे उच्चारण करताना दिसणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुस्लिम समाजाचे लोकही पुढे येत आहेत. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला यांचे कुटुंबीय मदनपुराजवळ शहनाई वाजवून नरेंद्र मोदींचे स्वागत करतील. (PM Road Show)

महापुरूशांचे कटआउटस

पंतप्रधानांनी आईच्या चरणांना स्पर्श केल्याचे चित्रही रोड शोमध्ये पाहायला मिळणार आहे. रोड शोच्या मार्गावर अनेक ठिकाणी काशीच्या सेलिब्रिटींची छायाचित्रेही पाहायला मिळतील. काशी नरेश, पंडित मदन मोहन मालवीय, बिस्मिल्ला खान, पंडित किशन महाराज, तुलसीदास, कबीर दास आणि संत रविदास महाराज यांच्यासारख्या तमाम थोर संत आणि व्यक्तींचे चित्रे रोड शो दरम्यान बघायला मिळणार आहे, ज्यांची जन्मभूमी किंवा कर्मभूमी वाराणसी राहिली आहे. (PM Road Show)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : ऐन रणधुमाळीत धुळ्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का; प्रदेश सरचिटणीसाचा भाजपामध्ये प्रवेश)

काशीचा विकास

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या काळात झालेल्या विकासकामांचे कटआउट सुद्धा बघायला मिळणार आहे. यात टीएफसी, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर, कॅन्सर हॉस्पिटल इत्यादी असतील. (PM Road Show)

10 लाख लोकांना निमंत्रण

14 मे रोजी काशी कोतवाल बाबा कालभैरवाचे दर्शन घेतल्यानंतर आणि त्यांची परवानगी घेतल्यानंतर पंतप्रधान नामांकन करतील. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि प्रतिष्ठित व्यक्ती या नामांकनात असण्याची शक्यता आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कामगारांसोबत बैठक घेण्याचाही प्रस्ताव आहे. पंतप्रधानांच्या रोड शोसाठी मंत्री आणि आमदार मठ, मंदिरे, धार्मिक स्थळे, सामाजिक संस्था, विशेष सोसायट्या, संस्थाच्या सदस्यांना सामील करून घेतले जात आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.