Amit Shah : राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला का गेले नाही ? अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना स्पष्टच विचारले

Amit Shah : उद्धव ठाकरे यांनी ज्यांचे नाव घेणे सध्या सोडून दिले आहे, अशा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून मी भाषणाची सुरुवात करत असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. या वेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना ५ प्रश्न विचारले आहेत.

142
Amit Shah : राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला का गेले नाही ? अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना स्पष्टच विचारले
Amit Shah : राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला का गेले नाही ? अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना स्पष्टच विचारले

अयोध्यातील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण तुम्हाला मिळाले होते. तरी देखील तुम्ही प्राणप्रतिष्ठेला का गेले नाही ?, असा प्रश्न अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. काश्मीरमधून कलम 370 काढण्यात आले, हे योग्य झाले नसल्याचे राहुल गांधी म्हणतात. योग्य की अयोग्य याचे उत्तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी द्यावे, असे आवाहन अमित शहा (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. (Loksabha Election 2024)

(हेही वाचा – Elephanta Caves Photos : महानगरातली वैभवशाली लेणी आणि ‘तिसऱ्या डोळ्याची कमाल’ )

धुळे लोकसभा मतदारसंघांतील भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अमित शहा यांनी भाषणाची सुरुवातच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून केली. उद्धव ठाकरे यांनी ज्यांचे नाव घेणे सध्या सोडून दिले आहे, अशा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून मी भाषणाची सुरुवात करत असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. या वेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना ५ प्रश्न विचारले आहेत.

  • काँग्रेसचे नेते आतंकी कसाबचे समर्थन करतात. उद्धव ठाकरे हे या मुद्द्यावर काँग्रेसच्या नेत्यांसोबत आहे का? याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे.
  • तीन तलाक कायदा रद्द करण्याची भाषा काँग्रेस करत आहे. या बाबतील उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत आहे का?
  • काँग्रेस पक्षाला मुस्लिम पर्सनल लॉ लागू करायचा आहे. या मुद्द्यावर राहुल गांधी यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?
  • काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी वीर सावरकर यांचा विरोध करतात. राहुल गांधी यांच्या सोबत उद्धव ठाकरे आहेत का?
  • स्टॅलीन आणि त्यांचे सहकारी सनातन धर्माचा विरोध करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जीवन हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी घालवले. त्या सनातन धर्माला ते विरोध करत आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत हात मिळवत आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट करावे की, जे सनातन धर्माच्या विरोधात आहेत, त्यांचे उद्धव ठाकरे समर्थन करतात का? असा प्रश्न अमित शहा यांनी उपस्थित केला.
सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिंमत मोदी सरकारने दाखवली

अमित शाह पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण असूनही ते अयोध्येत राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला का गेले नाही, याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्राच्या मतदारांना द्यावे. मुस्लिम समाजाच्या मतांसाठी उद्धव ठाकरे अयोध्येत गेले नाहीत. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार होते. त्या सरकारमध्ये शरद पवार देखील मंत्री होते. त्या दहा वर्षांच्या कार्यकाळात भारतात अनेक वेळा बॉम्बस्फोट झाले. मात्र नरेंद्र मोदी सरकारमध्ये आल्यानंतर भारताकडे पाहण्याची हिंमत कोणी दाखवली, तर सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिंमत नरेंद्र मोदी सरकारने दाखवली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.