- ऋजुता लुकतुके
एकाच फ्रँचाईजीकडून २५० सामने खेळणारा विराट कोहली (Virat Kohli) हा आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात विराटने हा मापदंड सर केला. महेंद्रसिंग धोणी (२६३), रोहीत शर्मा (२५४) आणि दिनेश कार्तिक (२५३) या इतर तीन खेळाडूंनी २५० सामने खेळले आहेत. पण, ते विविध संधांकडून. पण, विराट आयपीएलच्या सुरुवातीपासून एकाच संघाकडून खेळतोय. (IPL 2024 Virat Kohli)
या कालावधीत विराटने ८,०२४ धावा केल्या आहेत त्या ३८ च्या सरासरीने. त्याचा स्ट्राईकरेट आहे १३१.७० धावांचा. त्याच्या नावावर ८ शतकं आणि ५५ अर्धशतकं आहेत. (IPL 2024 Virat Kohli)
𝗠𝗼𝗻𝘂𝗺𝗲𝗻𝘁𝗮𝗹 𝗠𝗼𝗺𝗲𝗻𝘁 🥳
2️⃣5️⃣0️⃣ IPL appearances for @imVkohli 👏
Who are you supporting in this must win #RCBvDC clash? 🤔
Follow the Match ▶️ https://t.co/AFDOfgLefa#TATAIPL pic.twitter.com/6oEf91ayFx
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024
(हेही वाचा – कवी, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक Satchidananda Rautarai)
विराटने एकाच हंगामात केल्या सर्वाधिक ‘इतक्या’ धावा
आयपीएलमध्ये विराटची (Virat Kohli) सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे नाबाद ११३ धावांची. २००९, २०११ आणि २०१६ अशी तीनदा त्याने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. पण, त्याचा संघ बंगळुरू अजून चषकावर नाव कोरू शकलेला नाही. स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. २०१६ मध्ये विराटने एकाच हंगामात सर्वाधिक म्हणजे ९७३ धावा केल्या होत्या. त्याची सरासरी ८४ धावांची आणि स्ट्राईकरेट १५० धावांचा होता. आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या नाबाद ११३ ही त्याच हंगामातील आहे. (IPL 2024 Virat Kohli)
आताच्या हंगामातही विराटकडे (Virat Kohli) ऑरेंज कॅप आहे. १३ सामन्यांत ७० च्या सरासरीने त्याने ६६१ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईकरेटही १५५ धावांचा आहे. आणि सरासरी आहे ७० धावांची. या हंगामात त्याच्या नावावर एक शतक आणि ५ अर्धशतकं आहेत. (IPL 2024 Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community