Dabholkar Murder Case : भरकटलेला तपास आणि कपोलकल्पित कथा!

या खटल्यातील (Dabholkar Murder Case) आणखी एक संशयित विक्रम भावे हे अन्वेषण यंत्रणांच्या कार्यालयात गेल्यावर त्यांच्यावर अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

192
  • अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात (Dabholkar Murder Case) सीबीआयने पहिल्यापासून सीबीआयने तपासाच्या नावाखाली जो सावळागोंधळ घातला, त्यावरून ‘खुन्यापर्यंत पोहोचण्यासाठी सीबाआय खरोखरंच गंभीर होती का? की सनातनला गोवण्यासाठीच अन्वेषणाचा ‘खेळ’ रचला गेला?’, याचेच अन्वेेषण करण्याची आता वेळ आली आहे. सीबीआयचा तपास कसा भरकटला? आणि त्यांनी न्यायालयासमोर मांडलेले साक्षीपुरावे हे किती उथळ आणि बाळबोध होते, हे सामान्य जनतेच्या लक्षात यावे, यासाठी त्याचा आधार घेऊन लिहिलेला हा लेखप्रपंच!

‘सीबीआय’साठी खंडेलवाल आणि नागोरी निर्दोष!

या खटल्यात ज्यांना पहिल्यांदा अटक झाली, ते शस्त्रतस्कर विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी यांच्या संदर्भात पुणे पोलीस उपायुक्त भांबरे यांनी सत्यप्रतिज्ञापत्रावर न्यायालयात सांगितले की, त्या दोघांना कोपरखैरणे(नवी मुंबई) येथून अटक करण्यात आली. कोपरखैरणे ते पुणे हे अंतर २ ते अडीच तास असून हत्या झाल्यावर बंदूक तिकडे गेली, हे निश्चित आहे. या दोघांसमवेत बगाडे आणि माळी असे २० ते २४ ते वर्षे वयोगटातील २ युवक होते. त्यामुळे ‘या दोघांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या केली का?’, याचा तपास होणे आवश्यक होते; कारण कथित प्रत्यक्षदर्शी साक्षादारांच्या जबाबावरून मारेकरी हे २० ते ३० वर्षे या वयोगटातील होते. या ठिकाणी विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट की, भांबरे यांनी केलेला तपास ‘सीबीआय’ने स्वीकारला; मात्र भांबरे यांना ‘सीबीआय’ने साक्षीदार म्हणून पडताळले नाही. त्यामुळे ‘नेमके सत्य काय?’, ते न्यायालयासमोर आले नाही. असे असताना खटला चालू झाल्यावर मात्र खंडेलवाल आणि नागोरी यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले. यामुळे सीबीआयच्या भूमिकेवर निश्चित प्रश्नचिन्ह निर्माण होते. (Dabholkar Murder Case)

जबाब नोंदवताना नियम धाब्यावर !

दाभोलकर यांच्या हत्येचा (Dabholkar Murder Case) ज्यांच्यावर आरोप करण्यात आला, ते संशयित शरद कळसकर यांच्या जबाबाचा गवगवा करण्यात आला. तो जबाब ज्यांनी घेतला त्या अभिनव खरे यांना ‘सीबीआय’ने साक्षीदार म्हणून तपासले नाही. वस्तूत: शरद कळसकर यांचा जबाब घेतल्यावर त्यांना तातडीने न्यायादंडाधिकाऱ्यांकडे सादर करून ‘हा जबाब मारहाण न करता घेतलेला आहे’, असे सिद्ध करणे आवश्यक होते; मात्र तसे काहीच करण्यात आले नाही. यात कळसकर यांना न्यायदंडाधिकाऱ्यांकडे नेल्याचाही कोणताही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे हे सर्व केवळ कागदपत्रे बनवण्यासाठी, ‘मिडिया ट्रायल’ करण्यासाठी, तसेच जामीन नाकारण्यासाठीच करण्यात आले आहे. जबाब नोंदवताना ही प्राथमिक प्रक्रिया असते, त्याचेही पालन करण्यात आले नाही.

(हेही वाचा Muslim : भारतातील वाढती मुसलमानांची लोकसंख्या धोक्याची घंटा)

विक्रम भावे यांच्या अटकेचा फार्स !

याच खटल्यातील (Dabholkar Murder Case) आणखी एक संशयित विक्रम भावे हे अन्वेषण यंत्रणांच्या कार्यालयात गेल्यावर त्यांच्यावर अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यांनी तसे करण्यास नकार दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी विक्रम भावे यांना त्यांचे स्वत:चेच छायाचित्र घेऊन कार्यालयात बोलावले आणि त्यांना अटक केली. अटकेचा पंचनामा करताना सीबीआयने ‘शरद कळसकर यांनी विक्रम भावे यांना ओळखले’, असे नमूद केले; मात्र हे करताना त्यांनी लबाडी केली असल्याने ती उघड पडली. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने त्यांच्या कागदपत्रात संशयित विक्रम भावे यांचे छायाचित्र दुपारी २.३० वाजता जप्त केले आणि शरद कळसकर यांनी विक्रम भावे यांचे छायाचित्र ओळखल्याची वेळ दुपारी २ वाजताची दाखवली आहे. जर छायाचित्र २.३० वाजता जप्त केले असेल, तर ते २ वाजता कसे ओळखता येईल? विक्रम भावे यांना अडकवण्यासाठी सीबीआयने सापळा रचला; मात्र त्या सापळ्यात सीबीआयचे अधिकारी स्वतःच फसले !

म्हणे आरोपी एकत्र भेटले !

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील (Dabholkar Murder Case) मुख्य संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि ‘ज्यांनी गोळ्या झाडल्या’, असा आरोप आहे ते सचिन अंधुरे अन् शरद कळसकर हे तिघे एकत्र भेटल्याचा, तसेच त्यांचे एकत्र संभाषण झाल्याचा एकही पुरावा अन्वेषण यंत्रणांनी सादर केलेला नाही. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा या हत्येशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

कथेत ‘सोमनाथ धायडे’ पात्राचा प्रवेश!

सीबीआयने रचलेल्या कथेत ‘डॉ. दाभोलकर यांची हत्या मी केली’, असे शरद कळसकर यांनी सोमनाथ धायडे यांच्याकडे म्हणे मान्य केले होते ! वास्तविक डॉ. दाभोलकर यांची हत्या वर्ष २०१३ मध्ये झाली. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये म्हणजे पुढील ५ वर्षे ‘धायडे यांनी कळसकर यांनी हत्या केल्याचे मान्य केले’, हे अन्वेषण यंत्रणांपासून का लपवून ठेवले? हे एक कोडेच आहे. ‘सीबीआय’चे तेव्हाचे पोलीस अधिकारी एम्.एस. पाटील हे धायडे यांच्याकडे आदल्या दिवशी रात्री ९ वाजता घरी गेले आणि ‘तुम्हाला उद्या मुंबई येथील ‘सीबीआय’च्या कार्यालयात उपस्थित रहायचे आहे’, असे फर्मान सोडले. हा जबाब २ घंट्यांमध्ये संपणे अपेक्षित होते. असे न होता सकाळी १० ते रात्री ७.३० इतक्या कालावधीत धायडे यांचे दीर्घवेळ अन्वेषण का करण्यात आले? धायडे हा खोटा साक्षीदार ‘सीबीआय’ने उभा केला, हे सिद्ध होते. धायडे यांचा जबाब घेताना अधिकाऱ्यांनी ‘तुम्हाला डॉ. दाभोलकर प्रकरणाची (Dabholkar Murder Case) काही माहिती आहे का?’, वगैरे प्रश्न विचारणे अपेक्षित होते. असे काहीच झाले नाही. धायडे यांनी ‘न्यायालयात असे कोणतेच प्रश्न विचारले नाहीत?’, हेही मान्य केले आहे. कळसकर आणि अंदुरे या दोघांना या प्रकरणात गोवायचे होते अन् त्यांच्या विरोधात साक्षीपुरावे सादर करायचे होते. त्यामुळे धायडे यांची भेट अंदुरे यांच्याशी झाल्याचे दाखवायचे होते? हे दाखवण्यासाठी सीबीआयने शक्कल लढवली. ‘वर्ष २०१२ मध्ये संभाजीनगर येथील गारखेडा येथील मैदानात हिंदु जनजागृती समितीची सभा झाली. या सभेत धायडे आणि सचिन अंदुरे यांचा परिचय झाला, तसेच अन्य लोकांची भेट झाली’, असे सांगण्यात आले. या ‘भेटी’चे भांडवल करून कळसकर आणि अंदुरे यांच्या विरोधात धायडे यांना साक्षीदार म्हणून उभे करायचे होते; मात्र माहिती अधिकाराच्या माहितीतून सीबीआय पुन्हा उघडी पडली. या मिळालेल्या माहितीत ‘या मैदानावर कधीच हिंदु जनजागृती समितीची सभा झाली नाही’, असेच सिद्ध झाले. त्यातून हा साक्षीदार खोटे बोलतो, हेच सिद्ध झाले. या प्रकरणात खरेतर ‘सीबीआय’ने तेथे सभा झाल्याचे सिद्ध करणे अपेक्षित होते, तसेही झाले नाही !

(लेखक दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींच्या बाजूने न्यायालयात युक्तीवाद करणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता आहेत.)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.