घारापुरी लेणी म्हणजे Elephanta Caves ही महाराष्ट्रामधील मुंबईनजीकच्या घारापुरी बेटांवर असलेली सुंदरवैभवशाली लेणी. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात तयार करण्यात आले आहे. १९८७ साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला. मुंबई दर्शनमधल्या अनेक पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ म्हणून या लेणीकडे पाहिले जाते. घारापूरी लेणी मुंबईत नाही तर मुंबईपासून दहा कि.मी. अंतरावर समुद्रात हे स्थळ आहे. गेट वे ऑफ इंडियावरून दुरूनच नजर टाकली की समुद्राच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण अंधुक किंवा धूसर का होईना पण नजरेत पडते. असं हे ठिकाण म्हणजे दुसरं तिसरं कोणतं नसून घारापुरी किंवा एलिफंटा केव्हज् होय. (Elephanta Caves Photos)
एलिफंटा केव्हज् मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरूच जाता येतं. गेट वे ऑफ इंडियावरून सकाळी ९ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतच बोटी उपलब्ध आहेत. एलिफंटावरून परतण्यासाठी संध्याकाळी शेवटची बोट ५ वाजता आहे. येथे पोहोचल्यावर दोन रस्ते दिसतात. एक गुंफाकडे जाणारा आणि दुसरा हिलवर जाणारा. गुंफेकडे जाणा-या रस्त्याने आत गेलं की आपल्याला प्रवेश शुल्क भरावं लागतं. पंधरा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश आहे तर मोठय़ा माणसांसाठी दहा रुपये शुल्क आकारण्यात येतं. सोमवारी मात्र या गुंफा बंद असतात. थोडं पुढे गेलं की पहिलीच गुंफा दिसते. एलिफंटा लेणी समूहात एकूण ७ शैलीकृत लेणी आहेत. त्यापैकी ५ शैलकृत लेणी पश्चिम टेकडीवर आहेत तर उरलेल्या दोन या पूर्वेकडील टेकडीवर आहेत.
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ
1987 मध्ये, एलिफंटा लेणी, ५व्या- ६व्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केल्या गेल्या. या दगडी गुंफा इतिहास आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. लहानपणापासून येथील कोरीव मूर्ती अभ्यासाच्या पुस्तकात, वर्तमान पत्रात, विविध सरकारी मुखपत्रात, चित्रपटात, वेबसाईट वर, फोटोग्राफमध्ये पाहिल्या होत्या. आता पाहुयात आधुनिक कॅमेऱ्याच्या सहयाने काढलेले घारापूरीमधील आकर्षक लेण्याचे फोटोज् (Elephanta Caves Photos)
——————————————————————————————————