- ऋजुता लुकतुके
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यानच्या सामन्यात मैदानावर खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा कशी रंगू शकते याचं उदाहरण बघायला मिळालं. विराट कोहली आणि ईशांत शर्मा मैदानाबाहेरही चांगले मित्र आहेत. आणि यावेळी दोघांमधील मैदानावरील द्वंद्व पाहायला मिळालं. पहिल्या प्रसंगात ईशांतच्या गोलंदाजीवर विराटने लागोपाठ एक चौकार आणि षटकार ठोकला. पण, त्याच षटकात ईशांतने विराटला बादही केलं. यष्टीरक्षक अभिषेक पोरेलकडे झेल देऊन विराट बाद झाला. त्यानंतर आनंद साजरा करताना ईशांत विराटकडे चालत गेला आणि त्याने विराटला कोपरखळी मारली. पण, यावर विराट त्याच्याकडे बघून सूचक हसला आणि त्याने डोकं झुकवून ईशांतचं अभिनंदनही केलं. ‘यावेळी तू जिंकलास,’ असा विराटचा अविर्भाव होता. (IPL 2024, Virat, Ishant Banter)
विराटने १३ चेंडूंत २७ धावा करताना ३ षटकार आणि १ चौकार लगावला होता. बंगळुरूने अखेर निर्धारित २० षटकांत ९ बाद १८७ धावा केल्या. त्यानंतर दिल्लीचा डाव सुरू झाला. आणि यावेळी विराटला संधी मिळाली. (IPL 2024, Virat, Ishant Banter)
— Fo (@klxzone) May 12, 2024
(हेही वाचा – IPL 2024 KKR Victory Lap : बाद फेरीतील स्थान पक्कं झाल्यावर कोलकाता संघाने ईडन गार्डन्सवर मारली विजयफेरी)
यांच्यातही रंगले विनोद
दिल्लीचा डाव कोसळला आणि अठराव्या षटकांत ईशांत फलंदाजीला उतरला. तोपर्यंत दिल्लीचा पराभव निश्चित झाला होता. त्यामुळे यावेळी विराटने ईशांतवर बाजी उलटवली. विराटने खेळपट्टीच्या दिशेनं जाऊन ईशांतची टर उडवली. आणि दोघंही हसताना दिसले. दोघांमध्ये १-२ मिनिटं हास्यविनोद झालेले दिसले. (IPL 2024, Virat, Ishant Banter)
या प्रसंगांमुळे समालोचन कक्षात नवज्योत सिंग सिद्धू आणि मोहम्मद कैफ यांच्यातही विनोद रंगले. ‘एक छोटा मुलगा मोठ्या पर्वताखाली आश्रयाला आल्यासारखं वाटतंय,’ असं सिद्धू विराटच्या उंचीवरून म्हणाले. त्यावर कैफ म्हणाला, ‘उंच माणसाला नजर खाली ठेवून बोलावं लागतं. तर हुटक्या माणसाचं डोकं उजळ असतं.’ त्यावर सिद्धूनेही विराटची उंची कमी असली तरी कर्तृत्व हिमालयासारखं असल्याचं बोलून दाखवलं. (IPL 2024, Virat, Ishant Banter)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community