Ghatkopar Hoarding Accident : होर्डिंग दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट

277
Ghatkopar Hoarding Accident : माजी पोलीस आयुक्तांचा निकटवर्तीय अर्षद खान विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेले होर्डिंग कोसळून (Ghatkopar Hoarding Accident) झालेल्या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी या घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. तसेच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या.

(हेही वाचा Rain in Mumbai : मुंबईत वादळी पावसाने दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले; १०० जण अडकले)

यावेळी झालेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. मुंबईतील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अशी होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दुर्घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आले असून हायड्रा आणि क्रेनच्या मदतीने हे होर्डिंग हटविण्याचे (Ghatkopar Hoarding Accident) काम सूरु आहे. आतापर्यंत 57 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून शासनाच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच या दुर्घटनेतील जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील तसेच आशा घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.