Neelam Gorhe : शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहरातील बूथ केंद्रांना दिली भेट

Neelam Gorhe : शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली, तसेच धनकवडी येथील शंकरबाबा महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

123
Neelam Gorhe : शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहरातील बूथ केंद्रांना दिली भेट
Neelam Gorhe : शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहरातील बूथ केंद्रांना दिली भेट

पुणे लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पुणे (Pune) शहरातील कसबा, खडक येथील बूथ केंद्रांना भेट दिली. तसेच तेथील मतदानाबाबत माहिती घेतली. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घेत असलेल्या मेहनतीबाबत डॉ. गोऱ्हे यांनी कौतुक केले. या भेटीमुळे महायुतीमधील सर्वांच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

(हेही वाचा – Ghatkopar Hording : उच्चस्तरीय चौकशी करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश)

या वेळी त्यांच्या सोबत पुणे शहर शिवसेनेचे सुधीर कुरूमकर, सुधीर जोशी, युवराज शिंगाडे, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत, कांताताई पांढरे, सुरेखा पाटील, अनिता पवार, सविता राणवडे, रेणुका रोकडे, भाजपच्या खडक बूथ केंद्राच्या कल्याणी नाईक यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कसबा गणपती आणि शंकरबाबा महाराजांचे घेतले दर्शन

लोकसभा निवडणुकीत (loksabha election 2024) महायुतीला घवघवीत यश मिळू देत आणि केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार येऊ देत आणि जनतेचा आणखीन विकास व्हावा यासाठी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली तसेच धनकवडी येथील शंकरबाबा महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.