हर हर महादेव! Chhatrapati Sambhaji Maharaj यांनी बनवले होते ’लेदर जॅकेट्स’

छत्रपती संभाजी महाराज आधुनिक आणि कल्पक होते. त्यांनी नवकल्पनांना बढावा दिला. म्हैसूरच्या सैन्याने सोडलेल्या प्राणघातक बाणांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या सैनिकांसाठी चामड्यापासून बनवलेले जॅकेट घालायला दिले.

197
हर हर महादेव! Chhatrapati Sambhaji Maharaj यांनी बनवले होते ’लेदर जॅकेट्स’

जिहादी मुघलांच्या तावडीतून देशाला स्वतंत्र करण्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतली आणि पुढे हिंदूवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. पाश्चात्य कालगणनेनुसार संभाजी राजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. (Chhatrapati Sambhaji Maharaj)

१६८१ ते १६८९ या काळात त्यांनी छत्रपती म्हणून शासन केले. मुघल साम्राज्य, तसेच जंजिरा ऍबिसिनियन आणि गोव्यातील पोर्तुगीज साम्राज्य यासारख्या रानटी उपर्‍यांविरुद्ध त्यांची लढाई निरंतर सुरु होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा त्यांनी यशस्वीपणे चालवला आणि स्वराज्य विस्तारात मदत केली. शिवरायांनी निर्माण केलेली राज्यपद्धती संभाजी राजेंनी पुढे सुरु ठेवली. (Chhatrapati Sambhaji Maharaj)

त्यांनी आपल्या वडिलांची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची बहुतेक धोरणे सुरु ठेवली. पी. एस. जोशी यांच्या मते, संभाजी राजे हे आपल्या प्रजेला निष्पक्ष न्याय देणारे उत्तम प्रशासक होते. पी. एस. जोशी लिहितात की संभाजी राजे, त्यांचे मंत्री आणि अधिकारी यांनी राज्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांना पाठिंबा दिला. त्यांनी विद्वानांना जमीन, धान्य आणि पैसा देऊन त्यांचा सन्मान केला. छत्रपती संभाजी महाराज हे धार्मिक होते आणि प्रजेचे रक्षक होते. त्याचबरोबर रणांगणात ते सिंहासारखे शत्रूंवर तुटून पडायचे. (Chhatrapati Sambhaji Maharaj)

(हेही वाचा – Ghatkopar Hording : उच्चस्तरीय चौकशी करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश)

छत्रपती संभाजी महाराज आधुनिक आणि कल्पक होते. त्यांनी नवकल्पनांना बढावा दिला. म्हैसूरच्या सैन्याने सोडलेल्या प्राणघातक बाणांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या सैनिकांसाठी चामड्यापासून बनवलेले जॅकेट घालायला दिले. हा प्रयोग यशस्वी ठरला. समोरुन विषारी बाण येत होते. मात्र मराठा सैन्याकडे लेदर जॅकेट असल्यामुळे त्या बाणांचा प्रभार झाला नाही आणि मराठे जिंकले. (Chhatrapati Sambhaji Maharaj)

जिहादी औरंगझेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला, त्यांना इस्लाम पंथ स्वीकारायला सांगितले. पण छत्रपतींनी मृत्यूचा स्वीकार केला, मात्र इस्लाम स्वीकारला नाही. स्वराज्यासाठी आपल्या छत्रपतींनी हालहाल होऊन मरण पत्करले. मात्र औरंगझेबाचे जिहादी मनसुबे पूर्ण झाले नाही. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने मराठी सैन्य प्राणपणाने लढत राहिले. अखेर औरंगझेबाचा अंत झाला आणि मुघलांना पराभूत करुन मराठ्यांनी भारतावर शासन केले. (Chhatrapati Sambhaji Maharaj)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.