Ghatkopar Hoarding Accident : रेल्वे प्रशासन आले अडचणीत?

दुर्घटना झालेल्या होर्डिंग प्रकरणी रेल्वे प्रशासन व जाहिरात कंपनी यांना एक दिवस आधीच महापालिकेच्या परवाना विभागाने नोटीस पाठवून पुढील आठ दिवसात हे होर्डिंग काढावे अशा प्रकारची सूचना केली होती.

595
Ghatkopar Hoarding Accident : माजी पोलीस आयुक्तांचा निकटवर्तीय अर्षद खान विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर नगर जवळील पेट्रोल पंपावरील महाकाय होर्डिंग पडून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण जखमी झाले. या दुर्घटना झालेल्या होर्डिंग प्रकरणी रेल्वे प्रशासन व जाहिरात कंपनी यांना एक दिवस आधीच महापालिकेच्या परवाना विभागाने नोटीस पाठवून पुढील आठ दिवसात हे होर्डिंग काढावे अशा प्रकारची सूचना केली होती. या होर्डिंगला मुंबई महापालिकेने कोणतीही परवानगी दिलेली नसून रेल्वे हद्दीत असल्याने रेल्वे प्रशासनाने निविदा काढून होर्डिंग बसवण्याकरता संस्थेची नेमणूक केली होती. मात्र रेल्वे हद्दीत हे होर्डिंग बसवताना महापालिकेच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता स्वतःच्या अधिकारातच याची परवानगी दिल्यामुळे रेल्वे प्रशासन आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

तब्बल तिप्पट आकाराचे होर्डिंग

महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई महापालिका मुंबईत होर्डिंग लावण्यासाठी ४०फूट बाय ४०फूट या आकारा शिवाय अधिक आकाराच्या जाहिरात होर्डिंगला परवानगी देत नाही. पण दुर्घटनाग्रस्त होर्डिंग हे १२० बाय १२० फूट आकाराचे होते. त्यामुळे रेल्वेने परस्पर निविदा काढून जाहिरात कंपनीची निवड केली होती. (Ghatkopar Hoarding Accident)

एक महिन्यापूर्वी बजावली होती नोटीस

विशेष म्हणजे मागील वर्षी होर्डिंगसाठी नारळाची झाडे तोडण्यात आली होती तसेच मागील फेब्रुवारी महिन्यात काही झाडे परवानगी न घेता कापण्यात आली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यावर एफआयआर नोंदवण्यात आला होता. या एफआयआर नुसार मुंबई महानगरपालिकेच्या परवाना विभागाने एक महिन्यापूर्वी महापालिकेने संबंधित जाहिरात कंपनीला नोटीस बजावली होती. यावेळी या होर्डिंगला रेल्वेने परवानगी दिल्याने रेल्वेलाही नोटीस बजावली होती असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – दक्षिण मुंबईत MNS ची मते ठरणार निर्णायक, मनसैनिकांचाही प्रचारात जोर)

दोन दिवसापूर्वी पुन्हा स्मरण नोटिस

या नोटीसद्वारे रेल्वे प्रशासनाकडून माहिती मागवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला कोणताही प्रतिसाद न दिल्याने अखेर दोन दिवसांपूर्वी महापालिकेने पुन्हा नोटीस बजावून पुढील आठ दिवसांत ही जाहिरात काढली जावी अशी सूचना केली होती. मात्र सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे हे महाकाय होर्डिंग पडून त्यात ६४ माणसे अडकली गेली. त्यातील ४ जणांचा मृत्यू रूग्णालयात उपचार सुरू असताना झाला. (Ghatkopar Hoarding Accident)

बेकायदा, परवाना नसलेल्या होर्डिंग करा कारवाई

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजावाडी रुग्णालयात रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबई सह राज्यात अशा प्रकारे असलेल्या सर्व होर्डिंग्जची तपासणी करून बेकायदा तथा परवाना नसलेले होर्डिंग आहेत, त्यांची तपासणी करून त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. तसेच अशा प्रकारचे होर्डिंग असतील तर त्यापासून भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना त्यांनी दिल्या आहेत. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.