India ने इराणचे चाबहार Port भाडेतत्त्वावर घेतले; 10 वर्षांसाठी करार

197

केंद्रीय बंदर (Port) , जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्री आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल इराणमधील चाबहार इथे 13 मे 2024 रोजी ‘शाहीद बेहेश्ती बंदर अंतिम केंद्र, चाबहार’च्या विकासासाठी दीर्घकालीन मुख्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या समारंभाला उपस्थित राहिले. ‘इंडिया पोर्ट ग्लोबल लिमिटेड’ (आय.पी.जी.एल.) आणि इराणच्या ‘पोर्टस् अँड मेरिटाईम ऑर्गनायझेशन’ (पी.एम.ओ.) यांच्यात हा करार झाला.

केंद्रीय मंत्र्यांनी इराणचे रस्ते आणि नागरी विकास मंत्री एच.ई. मेहरदाद बाझ्रपाश यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा केली. दोन्ही मंत्र्यांनी आपापल्या देशांतील नेतृत्वांच्या संपर्क उपक्रमांद्वारे द्विपक्षीय सहकार्य दृढ करण्याच्या आणि चाबहार बंदराला प्रादेशिक संपर्काचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

(हेही वाचा Ghatkopar Hoarding Accident : रेल्वे प्रशासन आले अडचणीत?)

केंद्रीय मंत्र्यांची ही भेट आणि दीर्घकालीन कंत्राटामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बळकट होतील तसेच अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांशी व्यापाराचे द्वार म्हणून चाबहारचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. चाबहार बंदर (Port) प्रकल्पाची उभारणी हा भारत व इराणसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.