सोमवारी दुपारपासून वादळी वारे आणि पाऊस (Rain in Mumbai) पडल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यागतची तसेच इतर ठिकाणच्या फांद्या तुटून दुर्घटना घडल्या. रात्री नऊ वाजेपर्यंत एकूण १८७ फांद्या असेल झाड पडून झालेल्या दुर्घटनेत पाच जण जखमी आणि एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात (Rain in Mumbai) शहर भागात १६, पूर्व उपनगरात १०४ पश्चिम उपनगरात ६७ अशा प्रकारे एकूण १८७ झाडे पडण्याचा तथा झाडांच्या फांद्या तुटून पडण्याचा दुर्घटना घडल्या.
वांद्र्यात झाडाची फांदी पडून एकाचा मृत्यू
वांद्रे हिल रोड येथील खिमजी पॅलेस येथील दुकानाच्या पावसाळी शेडवर उंबराच्या झाडाची फांदी पडली. यामुळे या शेडच्या खाली दोन जण अडकले गेले, त्यात इरफान खान या ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून अब्दुल खान वय(३८) हे जखमी झाले आहेत. तसेच जोगेश्वरी मेघवाडी परिसरातील नारळाचे झाड उन्मळून पडून पडण्याची घटना घडली. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून तसेच काही झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.
झाडांच्या फांद्या आणि झाडे पडण्याच्या घटना
- शहर भाग: १६ दुर्घटना
- पुर्व उपनगर: १०४ दुर्घटना
- पश्चिम उपनगर: ६७ दुर्घटना