Ghatkopar News Update: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, रात्रभर बचावकार्य सुरू

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफने रात्रभर खोदकाम करणाऱ्यासह बचावकार्य केले.

230
Ghatkopar News Update: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, रात्रभर बचावकार्य सुरू

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांची संख्येत वाढ झाली आहे. या घटनेतील मृतांची संख्या १४वर पोहोचली आहे. एकूण ८८ जण या घटनेत जखमी झाले आहेत. त्यापैकी ७४ जखमींना वाचवण्यात यश आले आहे, तर ३१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि नागरिक सुरक्षा यांच्याकडून देण्यात आली आहे. (Ghatkopar News Update)

एनडीआरएफचे (NDRF) निरीक्षक गौरव चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळलेल्या होर्डिंगखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी ढिगाऱ्यातून खोदकाम करणाऱ्यांनी ८ मृतदेह आधीच बाहेर काढले आहेत. अजून ४ मृतदेह ढिगाऱ्याखाली दबले असल्याचे त्यांनी सांगितले. (Ghatkopar News Update)

(हेही वाचा –हर हर महादेव! Chhatrapati Sambhaji Maharaj यांनी बनवले होते ’लेदर जॅकेट्स’ )

मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस आणि वादळामुळे होर्डिंग कोसळला. घाटकोपरच्या पेट्रोलपंपावर बेकायदा होर्डिंग पडल्याने आतापर्यंत १४ जणांना जीव गमवावा लागला आहे. सोमवारी संध्याकाळी बचावकार्य सुरू झाले, ज्यामध्ये ६४ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफने रात्रभर खोदकाम करणाऱ्यासह बचावकार्य केले.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलिसांनी जाहिरात एजन्सीचे मालक भावेश भिडे आणि इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भादवी. कलम (३०४) सदोष मनुष्यवध, (३३८,३३७) मानवी जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य करणे, (३४) एकापेक्षा अधिक आरोपी असणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

New Project 2024 05 14T092303.762

५ लाख रुपयांची मदत आणि जखमींना उपचार
बीएमसीने सोमवारी संध्याकाळी एका निवेदनात सांगितले की होर्डिंग कोसळल्यानंतर २० ते ३० लोक अजूनही ढिगाऱ्यात अडकले आहेत. मात्र, पेट्रोल पंपावर झालेल्या अपघातामुळे एनडीआरएफला ढिगारा हटवण्यात अडचणी येत होत्या, त्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत आणि जखमींना उपचार देण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा देखील दिला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.