Lok Sabha Election 2024: कर्णबधीर, दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांसाठी हेल्पलाइन, व्हिडीओ कॉलची सुविधा; कसा कराल वापर?

मतदानाच्या दिवसापर्यंत सक्षम अॅपवर दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना नोंद करता येणार आहे.

133
Minority Votes : अल्पसंख्यांक मतांसाठी महायुती सरकारकडून ‘मार्टी’ ची स्थापना

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाण्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेसाठी आवश्यक असलेली मागणी सक्षम अॅपवर नोंदवावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. (Lok Sabha Election 2024)

मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात २०मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेची जोरदार तयारी सुरू आहे. याचा एक भाग म्हणून अॅपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना संबंधित सुविधा पुरवणाऱ्या शासकीय आणि स्थान निश्चिती यंत्रणेला गरजेनुसार वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहायक पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असेही यादव यांनी सांगितले.

(हेही वाचा – हर हर महादेव! Chhatrapati Sambhaji Maharaj यांनी बनवले होते ’लेदर जॅकेट्स’)

या सेवेचा उपभोग घेण्यासाठी मतदानाच्या दिवसापर्यंत सक्षम अॅपवर दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना नोंद करता येणार आहे. सक्षम मोबाईलवर नोंदणी करू न शकलेल्या काही दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मागणी नोंदवण्यात येत आहे.

हेल्पलाइन, व्हिडियो कॉलची सुविधा
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाकडून १९५० हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करण्यात आला असून ०२२-२४१८३१४४/७०३९२९७१९७ हे दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी क्रमांकावर कर्णबधीर मतदारांसाठी सांकेतिक भाषेत संवाद साधण्यासाठी व्हिडियो कॉल सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागातील (Department of Social Justice) दिव्यांग मतदार सुविधेच्या नोडल अधिकारी सुनीता मते यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.