सांगली आणि मिरज रेल्वे (sangali Miraj Railway Station) स्थानकावर बॉम्ब (Bomb) ठेवल्याचा सांगली शहर पोलिसांना फेक कॉल आला आणि त्यानंतर पोलिसांची एकच पळापळ सुरू झाली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सर्व यंत्रणा मिरज आणि सांगली रेल्वे स्थानकावर दाखल झाल्या. परंतु हे पोलिसांचे मॉकड्रील (mock drill) असल्याचे कळल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (Sangli, Miraj)
सांगली शहर पोलिसांना सोमवारी रात्री सांगली आणि मिरज रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा फोन आला. यानंतर तत्काळ पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना माहिती देण्यात आली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सुधीर भालेराव, रेल्वे सुरक्षा दलाचे बाजीराव कडाळे, लोहमार्ग पोलिसचे संभाजी काळे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा मिरज रेल्वे स्थानकात दाखल झाला. तसेच बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस दलाचे बॉम्बशोधक पथक तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे बॉम्बशोधक पथकाकडून (Bomb Squad) रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. पोलिस अधीक्षकांसह फौजफाटा रेल्वे स्थानकावर दाखर्व झाल्यामुळे प्रवाशांमध्ये मात्र एकच गोंधळ उडाला होता. परंतु सांगली पोलिसांचे हे मॉकड्रील असल्याचे कळल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (Sangli, Miraj)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: कर्णबधीर, दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांसाठी हेल्पलाइन, व्हिडीओ कॉलची सुविधा; कसा कराल वापर?)
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलिसांना बॉम्ब ठेवण्याचा फोन आला होता त्यानंतर पोलिस अधीक्षकांसह सर्व यंत्रणा मिरज रेल्वे स्थानकात दाखल झाली. दोन रेलवे गाड्यांची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. पोलिसांकडून ४५ मिनिटांचे मॉकड्रील करण्यात आले. (Sangli, Miraj)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community