Photography Ban : किल्ल्यावर छायाचित्रणास बंदी ; नेमके कारण काय वाचा सविस्तर

सरकारची कोणतीही परवानगी न घेता प्रिवेडिंगच्या नावाखाली चुकीची कृत्य करत असल्याने, हे पाऊल उचलण्यात आले आहे.

432
Photography Ban : किल्ल्यावर छायाचित्रणास बंदी ; नेमके कारण काय वाचा सविस्तर

वसईच्या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असून येथे दररोज पर्यटकही येत असतात. इतिहास अभ्यासक, संशोधक विविध ठिकाणांहून किल्ल्यात संशोधनासाठी येत असतात. मोठ्या प्रमाणावर व्याप्ती असलेल्या या किल्ल्याच्या वास्तूंना एक वेगळे महत्त्व आहे. तसेच वसई किल्ल्यात विवाहपूर्व (प्रीवेडिंग) छायाचित्रण (prewedding), चित्रीकरणावर अखेर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीबाबतचे फलक पुरातत्व खात्याकडून लावण्यात आले आहेत. प्रीवेडिंग छायाचित्रीकरणावर बंदी आणण्याची मागणी दुर्गमित्रांनी अनेकदा केली होती. अखेर ती पूर्ण झाली असून त्यामुळे दुर्गमित्र आणि वसईकरांकडून आनंद व्यक्त होत आहे.  (Photography Ban)

वसई किल्ल्यात सात विविध चर्चे, साखर कारखाना, प्रवेशद्वार, पुरातन मंदिर अशा अनेक वास्तू यामध्ये आहेत. मात्र सध्या यातील अनेक वास्तूंची पडझड होत आहे. त्यातच येथे येणाऱ्या हौशी पर्यटकांकडून वास्तूंचे नुकसान होत होते. काही स्थानिक आणि इतर ठिकाणांहून आलेल्या पर्यटकांकडून किल्ल्यात विनापरवानगी व्हिडीओ चित्रीकरण, फोटोग्राफी, विवाहपूर्व चित्रीकरण करण्यात येत होते.

(हेही वाचा – Narendra Modi: लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याआधी मोदींनी दशाश्वमेध घाटावर केली प्रार्थना, ‘X’वर व्हायरल व्हिडीओ पहा)

विनापरवाना सुरू असलेले प्री वेडिंग छायाचित्रण करताना केंद्रीय पुरातत्वीय विभागाचे सर्व नियम व कायदे पायदळी तुडवले जात होते. बेकायदेशीर छायाचित्रण करणारी तरुण मंडळी, छायाचित्रकार (Photographer), व्यावसायिक फिल्म मेकिंग, कॉलेज तरुण-तरुणी किल्ल्यातील ऐतिहासिक मंदिरे, स्थळे, चर्च, बालेकिल्ला इत्यादींवर छायाचित्रे काढण्यासाठी वाट्टेल ते करताना दिसत होते. किल्ल्यातील कोणत्याही वास्तूवर उभे राहून फोटो काढत त्यांचे नुकसान करण्यात आले होते. 

(हेही वाचा – Narendra Modi:…तर आम्ही पाकिस्तानला बांगड्या घालायला लावू, पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर आक्रमक शब्दांत हल्लाबोल)

मागील वर्षी किल्ल्यात रील करण्याच्या नादात एका तरुणाने आग लावल्याचाही प्रकार उघडकीस आला होता. यामुळे ऐतिहासिक किल्ल्याची विटंबना, नुकसान होत होते. छायाचित्रण, प्रीवेडिंग चित्रीकरण बंद करण्याची मागणी दुर्गमित्रांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर वसई किल्ल्यावर (Vasai Fort) केंद्रीय पुरातत्व विभागातर्फे  (Central Department of Archaeology) सर्व प्रकारच्या छायाचित्रणास बंदी असल्याच्या नियमांचे फलक लावण्यात आले आहेत. आता या फलकानुसार कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी दुर्गमित्रांनी केली आहे. (Photography Ban)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.