Google Pixel 8a : गुगलचा ‘हा’ बजेट फोन भारतात लाँच, काय आहेत फिचर्स?

Google Pixel 8A : गुगलचा हा त्यामानाने स्वस्त फोन १२६ जीबी स्टोरेजसाठी ५२,९९९ रुपयांना मिळणार आहे 

586
Google Pixel 8a : गुगलचा ‘हा’ बजेट फोन भारतात लाँच, काय आहेत फिचर्स?
Google Pixel 8a : गुगलचा ‘हा’ बजेट फोन भारतात लाँच, काय आहेत फिचर्स?
  • ऋजुता लुकतुके

गुगल पिक्सेलच्या (Google Pixel 8a) चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. गुगल पिक्सेल ८ए (Google Pixel 8a) हा कंपनीचा स्वस्तातील फोन आता भारतात लाँच झाला आहे. स्वस्तात मस्त अशी या फोनची श्रेणी आहे. म्हणजे कितीतरी महागडे फिचर्स आणि स्टोरेज या फोनमध्ये तुलनेनं स्वस्तात उपलब्ध आहेत.  (Google Pixel 8a)

(हेही वाचा- Narendra Modi:…तर आम्ही पाकिस्तानला बांगड्या घालायला लावू, पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर आक्रमक शब्दांत हल्लाबोल)

गुगल पिक्सेल ८ (Google Pixel 8a) या कंपनीच्या मुख्य फोनचं हे स्वस्त व्हर्जन असणार आहे. पण, यातील बहुतांश फिचर मात्र सारखेच असतील. हा फोनही अँड्रॉईडवर आधारित असेल. आणि यात ८ जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे. फोनचा डिस्प्ले एमोल्ड पद्धतीचा ६.१ इंच आकाराचा असेल.  (Google Pixel 8a)

तर फोनचा प्राथमिक कॅमेरा १२.५ मेगापिक्सलचा असेल. त्याला एलईडी फ्लॅश लाईटही देण्यात आलाय. तर सेल्फी कॅमेरा हा १० मेगापिक्सलचा असेल. फोनचं स्टोरेज मात्र १२८ जीबी इतकं असेल. त्यात वाढ करता येणार नाही. म्हणजे एसडी कार्डची सोय यात नाही. (Google Pixel 8a)

(हेही वाचा- Narendra Modi: लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याआधी मोदींनी दशाश्वमेध घाटावर केली प्रार्थना, ‘X’वर व्हायरल व्हिडीओ पहा)

फोनमध्ये दोन सिम वापरता येतील. गुगल पिक्सेल ८ (Google Pixel 8a) ची किंमत ८९,००० रुपये इतकी आहे. तर ८ प्रोची किंमत १,०९,००० रुपये इतकी आहे. अशावेळी साधारणपणे तेच फिचर असलेला ८ए फोन हे गुगल पिक्सलचं किफायतशीर रुप आहे. यापूर्वी कंपनीच्या पिक्सेल ७ए फोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. (Google Pixel 8a)

गुगल पिक्सेल ८ए चं १२८ जीबी स्टोरेजचं मॉडेल हे ५२,९९९ रुपये तर ५१२ जीबीचं मॉडेल ५९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. (Google Pixel 8a)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.