मुंबई लोहमार्ग पोलीस दलात तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या मंजुरी आदेशावरून ‘इगो मीडिया’ या जाहिरात कंपनीला घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त बेकायदेशीर होर्डिंगला परवानगी देण्यात आल्याचा खुलासा मुंबई लोहमार्ग पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे. १० वर्षांसाठी ही होर्डिंग ‘लोहमार्ग पोलीस कल्याण निधी’च्या जागेवर उभे करण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली होती. लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या खुलाशामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Ghatkopar Hoarding Accident)
मुंबईमध्ये सोमवारी, (१३मे) दुपारी आलेल्या वादळी पावसामुळे घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्गावर हे महाकाय होर्डिंग पेट्रोलपंपावर पडून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १४ जणांचा बळी गेला, तर जवळपास ६४जण जखमी झाले आहे. हे महाकाय होर्डिंग ‘लोहमार्ग पोलीस कल्याण निधी’च्या जागेवर उभारण्यात आलेले असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आपली जबाबदारी झटकली आहे, असे त्यांनी प्रसिद्ध पत्रकावरून म्हटले जात आहे. (Ghatkopar Hoarding Accident)
(हेही वाचा – Retail Inflation : एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाई दर आटोक्यात, अन्नधान्याच्या किमती मात्र वाढल्या )
हे बेकायदेशीर महाकाय होर्डिंग हे इगो मीडिया या जाहिरात कंपनीने २०२१मध्ये ‘लोहमार्ग पोलीस कल्याण निधी’च्या जागेवर उभारण्यात आले होते. रेल्वे पेट्रोलपंपाशेजारी हे होर्डिंग उभारण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या मंजुरी आदेशावरून लोहमार्ग पोलीस कल्याण निधी विभागाने इगो मीडिया कंपनीला १० वर्षांसाठी परवानगी दिली होती, असा खुलासा लोहमार्ग पोलिसांनी प्रसिद्धीसाठी काढण्यात आलेल्या पत्रकात केला आहे.
लोहमार्ग पोलिसांनी बेकायदेशीर होर्डिंग परवानगीचा ठपका तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्यावर ठेवल्यामुळे खालिद यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांची लोहमार्ग येथून वर्षभरापूर्वी बदली झालेली असून सध्या त्यांची नेमणूक संरक्षण नागरी हक्क (PCR)विभागाचे अतिरिक्त महासंचालक (ADG), महाराष्ट्र पोलीस येथे आहे.
महानगरपालिकेचा खुलासा
महानगरपालिकेने सोमवारी काढलेल्या पत्रकात म्हटले होते की, इगो मीडिया या कंपनीला होर्डिंग उभारण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी एनओसी (NOC)दिली होती. त्यासाठी इगो मीडिया एजन्सी आणि लोहमार्ग पोलिसांनी मुंबई महानगरपालिकेची कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती किंवा महानगरपालिकेला याबाबत कळवले नव्हते, मुंबईत होर्डिंग उभारण्यासाठीचा आकार जास्तीस्त जास्त ४० बाय ४० फुटांची परवानगी आहे; परंतु दुर्घटनाग्रस्त होर्डिंगचा आकार १२० बाय १२० फुटांचा म्हणजे ३ पटीने अधिक होता. हे होर्डिंग पूर्णपणे बेकायदेशीर होते, असे महानगरपालिकेने म्हटले होते. याबाबत लोहमार्ग पोलीस आणि इगो मीडिया कंपनीला महानगरपालिकेकडून दुर्घटनेच्या काही दिवस अगोदर पत्रव्यवहार करून होर्डिंग काढण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या, असे मुंबई महानगरपालिकेने सोमवारी, (१४ मे) आपल्या पत्रकात म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community