IPL 2024 : हे इंग्लिश स्टार खेळाडू टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परत, बंगळुरूला बसणार मोठा फटका 

165
IPL 2024 : हे इंग्लिश स्टार खेळाडू टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परत, बंगळुरूला बसणार मोठा फटका 
IPL 2024 : हे इंग्लिश स्टार खेळाडू टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परत, बंगळुरूला बसणार मोठा फटका 
  • ऋजुता लुकतुके

पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाचा अष्टपैलू खेळाडू लियम लिव्हिंगस्टोन आपल्या दुखऱ्या गुडघ्यावर उपचारांसाठी सोमवारी मायदेशी इंग्लंडला परत गेला. (IPL 2024) या दुखापतीबरोबरच आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त होणं हा हेतूही त्या मागे होता. फक्त लिव्हिंगस्टोनच नाही तर जोस बटलर (राजस्थान रॉयल्स) (Rajasthan Royals), विल जॅक्स आणि रिकी टॉपली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) (Royal Challengers Bangalore) हे खेळाडूही इंग्लंडला परतले आहेत. जोस बटलरने आपल्या संघ सहकाऱ्यांना चषकासह फेसटाईम कसा असा संदेश दिला आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लिश संघ मायदेशी पाकिस्तान बरोबर टी-२० मालिका खेळणार आहे. त्यासाठीच इंग्लिश खेळाडू परतले आहेत.  (IPL 2024)

(हेही वाचा- Narendra Modi: लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याआधी मोदींनी दशाश्वमेध घाटावर केली प्रार्थना, ‘X’वर व्हायरल व्हिडीओ पहा)

लिव्हिंगस्टोनच्या जाण्याने पंजाब किंग्जला (Punjab Kings) फारसा फरक पडणार नाही. कारण, संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पण, फॉर्मात असलेल्या जोस बटलरची उणीव राजस्थान संघाला नक्कीच जाणवेल. तर रिकी टॉपली आणि विल जॅक यांच्या जाण्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) संघ कमकुवत झाला आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात टॉपली हा संघातील एकमेव सातत्यपूर्ण कामगिरी करणारा गोलंदाज होता. तर विल जॅकने ४५ चेंडूंत केलेलं शतक आणि शेवटच्या दोन सामन्यांत मोक्याच्या जागी केलेली फटकेबाजी यामुळे बंगळुरूला विजय सोपा झालाी होता. (IPL 2024)

बंगळुरूच्या शेवटच्या साखळी सामन्यात शनिवारी त्यांची गाठ चेन्नई सुपर किंग्जशी (Chennai Super Kings) असणार आहे. बाद फेरी गाठायची असेल तर बंगळुरूला विजय आणि तो ही मोठ्या फरकाने हवा आहे. अशावेळी विल जॅक्सची उणीव नक्कीच भासणार आहे.  (IPL 2024)

(हेही वाचा- Photography Ban : किल्ल्यावर छायाचित्रणास बंदी ; नेमके कारण काय वाचा सविस्तर)

पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लिश संघ टी-२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजला पोहोचणार आहे. वर दिलेल्या ४ खेळाडूंबरोबर मोईन अली (चेन्नई सुपर किंग्ज) (Chennai Super Kings), जॉनी बेअरस्टो, सॅम करन (पंजाब किंग्ज) (Punjab Kings) तसंच फिल सॉल्ट (कोलकाता नाईट रायडर्स) (Kolkata Knight Riders) हे इंग्लिश खेळाडूही काही दिवसांनी इंग्लंडला परतणार आहेत. (IPL 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.