- ऋजुता लुकतुके
गेल्या आठवड्यात भारतीय संघाची जर्सी प्रायोजित करणाऱ्या आदिदास ब्रँडने विमानातून भारतीय जर्सी धरमशाला मैदानावर उतरवली होती. रोहित (Rohit), कुलदीप (Kuldeep) आणि जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) हे तीन खेळाडू एका व्हीडिओत ही जर्सी घातलेले दिसले होते. एकप्रकारे हे जर्सीचं लाँचिंगच होतं. आता अधिकृतपणे बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) यांनी अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) एका कार्यक्रमात जर्सी लोकांसमोर आणली आणि खेळाडूंना बहालही केली. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- Retail Inflation : एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाई दर आटोक्यात, अन्नधान्याच्या किमती मात्र वाढल्या)
‘नवीन जर्सी घातलेल्या भारतीय संघाचं स्वागत करण्याची वेळ आली आहे,’ या शब्दांत बीसीसीआयने (BCCI) ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. ही आहे भारतीय संघाची टी-२० विश्वचषकाची नवीन जर्सी असा मथळा या ट्विटला देण्यात आला आहे. (T20 World Cup 2024)
It is time to welcome our team in new colors.
Presenting the new T20I #TeamIndia Jersey with our Honorary Secretary @JayShah, Captain @ImRo45 and official Kit Partner @adidas. pic.twitter.com/LKw4sFtZeR
— BCCI (@BCCI) May 13, 2024
भारतीय जर्सी ही निळ्या आणि भगव्या रंगात आहे. टी-शर्टच्या बाह्या भगव्या रंगाच्या आहेत. ‘एक जर्सी, एक देश,’ असं म्हणत ६ मे ला आदिदास कंपनीने भारतीय खेळाडूंचा एक व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला होता. जर्सीचा गळा त्रिकोणी आहे. आणि त्यावर भारतीय तिरंगा आहे. तर जर्सीच्या मध्यभागी इंडिया हा शब्द इंग्रजीत कोरलेला आहे. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: निवडणुकीमुळे फुलांच्या दरात वाढ, काय आहेत भाव? जाणून घ्या)
टी-२० विश्वचषकात (T20 World Cup) भारताचा पहिला सामना ५ जूनला आयर्लंडबरोबर असणार आहे. भारताचा समावेश ‘अ’ गटात झाला असून भारताबरोबर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड हे संघ आहेत. भारताचे साखळी सामने न्ययॉर्क इथं रसॉ काऊंटी स्टेडिअमवर होणार आहेत. ५ तारखेला आयर्लंड तर बहुचर्चित पाकिस्तान विरुद्धचा सामना ९ जूनला होणार आहे. त्यानंतर अमेरिका आणि कॅनडाचे सामने अनुक्रमे १२ आणि १५ जूनला होणार आहेत. (T20 World Cup 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community