Harvard University मधील संशोधकांनी सांगितली अकाली मृत्यूची ‘ही’ कारणे  

195
Harvard University तील संशोधकांनी सांगितली अकाली मृत्यूची ‘ही’ कारणे  

हवामान बदलाचा आपल्या वयावरही परिणाम होत आहे. शतकापूर्वी लोक दीर्घायुष्य जगत होते, पण आता तसे राहिलेले नाही. ‘ग्रिस्ट’ या अमेरिकन मासिकानुसार संशोधकांचे म्हणणे आहे की, हवामानातील बदल मानवी जीवन हिरावून घेत आहेत. याचे एक कारण प्राणी किंवा जीवजंतू आहेत. विकासाच्या नावाखाली मानवाने जंगले तोडून येथे घरे व उद्योग उभारले. त्यामुळे आपला प्राणी, डास, बॅक्टेरिया, बुरशी यांच्याशी संपर्क वाढला आहे. दुसरीकडे, हे सर्व प्राणी बदलत्या हवामान परिस्थितीशी जुळवून घेत आपल्या वातावरणात राहत आहेत. त्यांच्यापासून अनेक रोग पसरत आहेत, जे आपल्या जीवनासाठी धोकादायक ठरत आहेत. (Harvard University)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: निवडणुकीमुळे फुलांच्या दरात वाढ, काय आहेत भाव? जाणून घ्या)

तसेच बदललेली जीवनशैली यामुळे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी पुरत्या बदलून गेल्या आहेत. पॅक फूड, बाटलीबंद शीतपेये तसेच प्रोसेस्ड फूड यांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु असे खाद्यपदार्थ खाणे म्हणजे अकाली मृत्यूला कवटाळण्यासारखे आहे, असे अभ्यासातून पुढे आले आहे. यामुळे लवकर मृत्यू होण्याचा धोका ९ टक्के वाढतो.

WhatsApp Image 2024 05 14 at 13.01.30 17e899b3

अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील (Harvard University) संशोधकांनी याबाबत गेली ३४ वर्षे अभ्यास केला आहे. या काळात त्यांनी तब्बल १,१४,००० वरिष्ठ नागरिकांचे खाणेपिणे आणि आरोग्यस्थितीचा अभ्यास केला. हा अहवाल बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात सहभागींपैकी १ लाख जणांनी डबाबंद पदार्थांचे (Packaged food) सेवन केले होते, असे अहवालात म्हटले आहे. सध्या बाजारात मिळणाऱ्या प्रोसेस्ड फूड (Processed food) हे दीर्घकाळ टिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायने मिसळतात. ही रसायने मृत्यूसाठी कारणीभूत ठरतात. (Harvard University)

(हेही वाचा – Lok Sabha El ection 2024: …तर ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी हे पक्ष फुटलेच नसते, अमित शहांनी मुलाखतीत केलं ‘हे’ महत्त्वाचं वक्तव्य)

पदार्थांमध्ये वापरले जाणारे सोडियम आणि साखर (Sugar) यांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. या पदार्थांचे सेवन केल्याने कॅन्सर, मानसिक आरोग्यसंबंधीचे विकार, टाईप टू डायबीटीस आदींसारख्या रोगांमुळे अकाली मृत्यु (Premature Death) होण्याचा धोका संभावतो. तसेच नागरिकांना हे पदार्थ खाणे टाळून फळे, भाज्या, कडधान्ये आर्दीचे सेवन मोठ्या प्रमाणात करावे असा सल्ला हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी दिला आहे, या अभ्यासात ४८.१९३ मृत्यूमागच्या नेमक्या कारणांचे विश्लेषण केले आहे. (Harvard University)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.