तरुण वयात मोठ्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करणारा सॅमसंगचा माजी सीईओ आणि संगणक शास्त्रज्ञ Pranav Mistry

प्रणवने आपल्या करिअरची सुरुवात मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्न म्हणून केली. त्यानंतर, त्याने Google, CMU, NASA, UNESCO आणि JST साठी देखील काम केले आहे.

148

प्रणव मिस्त्री (Pranav Mistry) आता ४२ वर्षांचा आहे. अतिशय तरुण वयात त्याने नाव कमावलं. तो सॅमसंगचा माजी अध्यक्ष आणि सीईओ आहे. त्याचबरोबर तो एक संगण शास्त्रज्ञ आणि शोधकर्ता आहे. आता त्याने स्वतःचं ’टू’ नावाचं आर्टिफिशियल रियलिटी स्टार्टअप सुरु केलं आहे. सध्या तो सीईओ पदावर विराजमान आहे.

प्रणव मिस्त्रीचा (Pranav Mistry) जन्म १४ मे १९८१ रोजी गुजरात येथे झाला. प्रणवने आपल्या करिअरची सुरुवात मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्न म्हणून केली. त्यानंतर, त्याने Google, CMU, NASA, UNESCO आणि JST साठी देखील काम केले आहे. एवढ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये महत्वाच्या पदावर काम केल्यामुळे तरुणपणीच तो प्रसिद्धीच्या झोतात आला.

(हेही वाचा Ghatkopar Hoarding Accident: तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी होर्डिंगसाठी दिली होती परवानगी, नेमकं काय आहे प्रकरण?)

एमआयटीमधून पीएचडी करुन तो सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये उपाध्यक्ष झाला. पुढे ग्लोबल व्हाईस प्रेजिडेंट आणि कॉर्पोरेट एसव्हीपी म्हणूनही काम केलं. २०१९ मध्ये तो स्टार लॅब्स येथे अध्यक्ष आणि सीईओ झाला. सिक्स्थसेन्स, गॅलेक्सी वॉच, गियर ३६०, बिक्सबी एआर आणि प्रोजेक्ट नियोनमध्ये त्याने महत्वपूर्ण योगदान दिले. पुढे २०२१ मध्ये त्याने टू नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली. माऊसलेस – ऍन इन्व्हिजिबल कंप्युटर माऊस; स्पर्श – डिजिटल डिव्हाइसमध्ये डेटा कॉपी-पेस्ट करण्याची अद्भुत पद्धत; क्विकीज – इंटेलिजेंट स्टिकी नोट्स; ब्लिंकबोट – अ ब्लिंक कंट्रोल्ड रोबोट इत्यादी आविष्कार घडवून त्याने डिजिटल जगात क्रांती घडवून आणली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.