Terrorist Arrested: पासपोर्टशिवाय भारतात अवैधरित्या राहणाऱ्या २ बांगलादेशी दहशतवाद्यांना आसाममध्ये अटक

बहार मिया आणि रेचेल मिया अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.

184
Terrorist Arrested: पासपोर्टशिवाय भारतात अवैधरित्या राहणाऱ्या २ बांगलादेशी दहशतवाद्यांना आसाममध्ये अटक
Terrorist Arrested: पासपोर्टशिवाय भारतात अवैधरित्या राहणाऱ्या २ बांगलादेशी दहशतवाद्यांना आसाममध्ये अटक

आसाम पोलिसांच्या विशेष पथकाने अल कायदाशी संबंधित २ बांगलादेशी दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी गुजरातमधून येथे आले होते आणि सिलचरला जात होते, असे सांगण्यात येत आहे. हे दोन्ही दहशतवादी गेल्या काही वर्षांपासून अवैधपणे भारतात वास्तव्याला होते. आसाममध्ये दहशतवादी जाळे पसरवणे हा त्यांचा उद्देश असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे दोघेही दीर्घकाळ पासपोर्टशिवाय भारतात अवैधरित्या राहत होते. (Terrorist Arrested)

यासंदर्भात आसाम पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बहार मिया आणि रेचेल मिया अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघेही अन्सारुल्ला बांगला टीमचे (एबीटी) सदस्य असून ते गुजरातहून सिलचरच्या दिशेने आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे पथकाने सोमवारी संध्याकाळी गुवाहाटी रेल्वे स्थानकावर कारवाई केली आणि दोघांना ट्रेनमधून अटक केली. अटकेनंतर या दहशतवाद्यांना विशेष शाखेच्या ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात आसाम पोलिसांच्या स्पेशल सेलमध्येही गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे दोन बांगलादेशी नागरिक दीर्घकाळ पासपोर्टशिवाय भारतात बेकायदेशीरपणे राहत होते आणि आसाममध्ये दहशतवादी नेटवर्क पसरवण्याचा कट रचत होते, असे आसाम पोलिसांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारुल्ला बांग्ला टीम (एबीटी) ही भारतीय उपखंडातील अल-कायदाशी (एक्यूआयएस) संलग्न असलेली प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे.

(हेही वाचा – Chocolate Peanut Butter : चॉकलेट आणि पीनट बटर फ्लेवर कॉम्बिनेशन्सचे प्रकार  )

राष्ट्रीय तपास संस्थेकडून तपास
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आसाम पोलिसांनी धुबरी जिल्ह्यातून अन्सारुल्ला बांगला टीमच्या २ सदस्यांना अटक केली होती आणि नंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या प्रकरणाचा तपास केला. आसाम पोलिसांनी २०२२ मध्ये काही एबीटी मॉड्यूल्सचा पर्दाफाश केला आणि दहशतवादी गटाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अनेक लोकांना अटक केली. एका वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, त्यांना राज्यातील काही लहान मदरशांशी एबीटीचे संबंध आढळले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.