मुंबई घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेने सर्व होर्डिंग्जधारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांची पायमल्ली करून शहरात तब्बल २ हजार ५०० अनधिकृत होर्डिंग (Unauthorized Hoardings) उभारण्यात आले असल्याची त्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Pune Unauthorized Hoardings)
तर पालिकेचा अधिकृत परवाना घेऊन तितकेच होर्डिंग उभारण्यात आले आहे. या तब्बल ५ हजार होर्डिंगच्या स्ट्रक्चरच्या सुरक्षितते बाबत महापालिका देखील शाशंक आहे. त्यामुळे पालिकेने होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पावसाळ्यामध्ये असे होर्डिंग (Unauthorized Hoardings) कोसळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या होर्डिंगचे भूत पुणेकरांच्या मानगुटीवर बसले असणार आहे. या दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेला देखील जाग आली असून शहरातील सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Unauthorized Hoardings)
(हेही वाचा – Mrinal Sen : १८ राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे बंगाली चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार – मृणल सेन)
पुणे महापालिकेच्या (PMC) आकाशचिन्ह विभागाकडून शहरामध्ये होर्डिंगला परवानगी देण्यात येते. यासाठी शुल्क आकारणी करण्यात येत असते. शुल्क वाढीवरुन कायमच महापालिका आणि होर्डिंग मालक यांच्यामध्ये वाद आहे. त्यामुळे शुल्क भरण्यापासुन वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग उभारले जातात. (Pune Unauthorized Hoardings)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community