लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात येत्या २० मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत मतदान होत आहे. मुंबईकर महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात ‘महिला संचालित मतदान केंद्रे’ अर्थात ‘सखी मतदान केंद्र’ उभारण्यात येत आहेत. (Lok Sabha Election 2024)
मुंबई शहर जिल्ह्यातील दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघात मिळून एकूण ११ सखी मतदान केंद्रे असणार आहेत. ११ सखी मतदान केंद्रापैकी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात ६ तर मुंबई दक्षिण मतदारसंघात ५ सखी मतदान केंद्र असतील. प्रत्येक मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असून धारावी मतदारसंघात दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत. भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथील मतदान केंद्र क्रमांक १०० आणि धारावी ट्रान्सलेट कॅम्प मनपा शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक ८२ ही धारावी मतदारसंघातील दोन सखी मतदान केंद्र असतील. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Ravindra Dhangekar : पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन भोवले; काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल)
सखी मतदान केंद्रांवर महिलांसाठी आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. स्त्री-पुरुष समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र म्हणून याला ‘सखी मतदान केंद्र’ असे नाव ठेण्यात आले आहे. सखी मतदार केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी या महिलाच असणार आहेत. या मतदान केंद्राला लग्न मंडपासारखे सजविण्यात येते. जागोजागी रांगोळी, स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजाविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते, अशी माहिती मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community