PM Narendra Modi यांचा बुधवारी मुंबईत रोड शो

भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीत भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मिळून मुंबईतील प्रत्येकी तीन लोकसभा मतदारसंघ लढवत आहेत.

207
PM Narendra Modi यांचा बुधवारी मुंबईत रोड शो

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होत असून मुंबईकरांना साद घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बुधवारी मुंबईत रोड शो करणार आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच मुंबईत येत असून त्यांच्या स्वागतासाठी तसेच रोड शो यशस्वी करण्यासाठी मुंबई भाजपाची यंत्रणा सज्ज झाली आहे. (PM Narendra Modi)

भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीत भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मिळून मुंबईतील प्रत्येकी तीन लोकसभा मतदारसंघ लढवत आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही मुंबईतील लोकसभेच्या सर्व सहा जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार आहे. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेने मुंबईत राजकीय व्यूहरचना केली असून त्याचा एक म्हणून बुधवारी मुंबईत मोदींच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Pune Unauthorized Hoardings : नियमांची पायमल्ली करून शहरात तब्बल २ हजार ५०० अनधिकृत होर्डिंग)

या मार्गांवर होणार रोड शो 

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या रोड शोला संध्याकाळी पाच वाजता घाटकोपर पश्चिम येथून सुरुवात होईल. रोड-शोची सुरुवात अशोक सिल्क मिल, घाटकोपर पश्चिम इथून होऊन पार्श्वनाथ चौक, घाटकोपर पूर्व इथे रोड-शो समाप्त होईल. या रोड शो मध्ये महायुतीचे नेते, लोकसभा उमेदवार सहभागी होणार आहेत. (PM Narendra Modi)

याआधी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुंबईत रोड शो केला होता. या रोड शोला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यानंतर २००९ मध्येही असा रोड शो झाला होता. मधल्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मुंबईत रोड शो केला होता. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.